शरद पवारांचा राज ठाकरे पॅटर्न, भरसभेत लावला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ

On: April 24, 2024 9:59 PM
Sharad pawar
---Advertisement---

Sharad Pawar | देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलाय. देशातील जनतेचं लक्ष निवडणुकीकडं लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरस आहे. यंदाच्या 2024 लोकसभा निवडणुकीआधी राज्याचं राजकारण हे खालच्या पातळीवर गेल्याचं पाहायला मिळालं. तसेच सामान्य खेडेगावातील शेतकरी बांधव हे मोदी सरकारवर नाराज असल्याचं बोललं जातंय. अशातच आता माढ्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ लावत मोदींनी दिलेल्या आश्वासनावर बोट ठेवलंय. आतापर्यंत किती आश्वासनं पूर्ण केली यावरही शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलंय.

शरद पवारांनी लावला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ

माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी सभेला संबोधित करत असताना नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. धैर्यशील यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. दरम्यान रणजितसिंह हे भाजपचे उमेदवार असल्याने शरद पवार यांनी माढ्यात जात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारसभेत मोदींच्या आश्वासनाचा व्हिडीओ लावला. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतं आश्वासन पूर्ण केलं याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रश्न केला.

2014 वर्षात सुरूवातीला सत्ता आल्यानंतर मोदी पेट्रोलच्या दरात घट करणार होते. तेव्हा पेट्रोलचा दर हा 72  रूपये होता. तर आता पेट्रोलचा दर हा 106 रूपये आहे. निवडणुकीआधी लोकांची आश्वासनं पाळली गेलेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरू आहे, असा दावा शरद पवार यांनी केला.

याआधी नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेत. सत्तेत येण्याआधी गॅस सिलेंडर स्वस्तात देण्यात येईल असं मोदींनी सांगितलं होतं. मोदी सत्तेत येण्याआधी गॅस सिंलेंडरचा दर हा 460 रूपये होता. त्यानंतर आज तोच दर 1100 पर्यंत गेला आहे. देशामध्ये 100 पैकी 87 टक्के तरूण हे बेरोजगार आहेत. दहा वर्षांमध्ये नोट बंदी करण्यात आली. बँकेच्या दारात 700 लोकं दगावली गेली, असं शरद पवार म्हणालेत.

” हा पहिला पंतप्रधान आहे जो देशाचा विचार करत नाही”

“सामान्य माणसाच्या अधिकारावर गदा आणली जातेय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 3 वेळा निवडून आले होते यांना अटक केली जातेय. मोदींचे कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चालले आहे. जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी दहा वर्षे तुरूंगात घालवलीत. त्यांच्यावर मोदी टीका करतात. देशाचं चागलं करावं असं याआधीच्या पंतप्रधानांना वाटत होतं. मात्र हा पहिला पंतप्रधान आहे जो देशाचा विचार करत नाही,” असं शरद पवार म्हणालेत.

“मी सोलापूर येथे पालकमंत्री होतो. मी तेव्हा पाच लाख लोकांना दुष्काळी मदत केली होती. मोदींच्या मनात आली की कांदा निर्यातीवर बंदी केली. तर साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता. मात्र साखरेवर बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे आपल्या लोकांना पुन्हा निवडून द्यायचं”, असल्याचं शरद पवार म्हणालेत.

News Title – Sharad Pawar On Narendra Modi BJP At Madha Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

भाड्याचे कपडे घेऊन बॉलीवुड स्टार करतात स्टायलिंग; प्रसिद्ध अभिनेत्याने केली पोलखोल

‘बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून ..’; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम

“पुन्हा तुझं थोबाड दाखवू नकोस”, चेन्नईच्या गोलंदाजावर चाहते भडकले

सुरतमध्ये काँग्रेसमुळेच भाजपचा पहिला विजय?, सगळी स्क्रिप्ट आधीच ठरलेली?

…म्हणून IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही!

Join WhatsApp Group

Join Now