‘सरकारी योजनांमुळे कामगार…’; एस. एन. सुब्रह्मण्यन यांचं नवं वक्तव्य चर्चेत

On: February 12, 2025 4:09 PM
S. N. Subrahmanyan
---Advertisement---

S. N. Subrahmanyan l लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro – L&T) कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर (Chairman and Managing Director) एस. एन. सुब्रह्मण्यन (S. N. Subrahmanyan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम करावे, असे म्हटले होते. यावेळी त्यांनी सरकारी योजनांचा (Government Schemes) उल्लेख करत एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सुब्रह्मण्यन यांचे वक्तव्य :

“कामगार संधींसाठी इतर ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. कदाचित त्यांची स्थानिक अर्थव्यवस्था (Local Economy) चांगली आहे किंवा विविध सरकारी योजनांमुळे असे होत असावे,” असे वक्तव्य त्यांनी केले. सीआयआय साउथ ग्लोबल लिंकेजेस समिटमध्ये (CII South Global Linkages Summit) बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी बोलताना सुब्रह्मण्यन यांनी बांधकाम कामगारांविषयी (Construction Workers) मत व्यक्त केले.

‘कामगार स्थलांतर करण्यास तयार नाहीत’ :

बांधकाम उद्योगासाठी कामगार मिळणे कठीण झाले आहे, कारण ते आरामात राहत असल्यामुळे गाव सोडून स्थलांतर करण्यास तयार नसतात. मनरेगा (MNREGA), थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) आणि जन धन (Jan Dhan) खात्यांसारख्या योजना कामगारांच्या कामासाठीच्या प्रवासावर परिणाम करत असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कामगार ‘कामचोर’ झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

S. N. Subrahmanyan l एल अँड टी (L&T) समोरील आव्हान :

कामगारांच्या भरती आणि सोयीसाठी कंपनीची स्वतःची एचआर टीम (HR Team) आहे. पण असे असतानाही कामगारांची उपलब्धता होत नाही. बांधकाम मजुरांची भरती करत असताना अनेक अडचणी येत आहेत, असे एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी म्हटले आहे.

स्थलांतर आणि वेतनाची समस्या :

सुब्रह्मण्यन यांनी भारताला कामगार स्थलांतराची समस्या भेडसावत असल्याचे म्हटले आहे. L&T ला 4 लाख कामगारांची आवश्यकता असताना, कर्मचारी गळतीमुळे 16 लाख लोकांची भरती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, त्यांनी कामगारांच्या वेतनाचा पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त केली. कामगारांचा पगार महागाईशी (Inflation) सुसंगत असावा. मध्यपूर्व देश (Middle East Countries) अधिक वेतन देत असल्यामुळे तिकडे कामगार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत, कारण तिथे त्यांना भारताच्या तुलनेत 3 ते 3.5 पट जास्त पगार मिळतो, असे ते म्हणाले.

90 तास काम आणि ‘बायको’ वक्तव्य :

दरम्यान, सुब्रह्मण्यन यापूर्वीही त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे. घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार, अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

News title : L&T Chairman’s Statement on Labour Migration and Government Schemes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now