१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आई बनली, नंतर पाण्याच्या टाकीत बुडवून जुळ्या बाळांची हत्या

On: April 9, 2025 4:55 PM
twins
---Advertisement---

Loni Kalbhor | दहा वर्षांच्या संघर्षानंतर टेस्ट ट्यूब पद्धतीने आई बनलेल्या महिलेनं लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरात दोन महिन्यांच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केलं. बाळांच्या वाढीअभावी ती मानसिकदृष्ट्या खचली होती.

जुळी मुलं, पण वाढ थांबलेली

सांगली जिल्ह्यातील मिरजवाडी (Mirajwadi, Sangli) येथील मूळ रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय महिलेने १० वर्षांच्या अपत्याच्या प्रतीक्षेनंतर टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून दोन महिन्यांपूर्वी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. तिचा विवाह एका प्राथमिक शिक्षकाशी झाला असून, सध्या ती पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील दत्तनगरमध्ये (Dattanagar, Theur) माहेरी राहत होती.

मात्र बाळांच्या वाढीचा वेग अत्यंत कमी होता, आणि स्वतःचा बाळंतपणानंतरचा शारीरिक त्रासही वाढत चालला होता. आर्थिक खर्च, आरोग्याच्या अडचणी आणि बाळांच्या प्रकृतीबाबतची चिंता यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली होती. या मानसिक तणावातूनच तिने मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाळांना घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

शेजाऱ्यांनी जीव वाचवला

शेजाऱ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. मात्र, बाळांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Title : Loni Kalbhor Mother Drowns Twin Babies in Water Tank After 10-Year Wait

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now