Lok Sabha Election 2024 | देशासह राज्यात देखील लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात तर उमेदवारी न मिळाल्याने बरेच नेते नाराज झाले आहेत. त्यातच अमरावती लोकसभेत तर हा संघर्ष पार पराकोटीला गेल्याचं दिसून आलं.
2019 मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या परभवाचा वचपा काढण्यासाठी अडसूळ यांनी राणा यांना आव्हान देण्याचं ठरवलं होतं. अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून ते निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, नवनीत राणा यांनी भाजपात पक्ष प्रवेश करत तिकीट मिळवण्यात यश मिळवलं. आता राज्यात महायुतीचं सरकार असल्याने अडसूळ यांची पंचाईत झाली.
नवनीत राणा अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला
आनंदराव अडसूळ यांनी जातप्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राणा यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढली होती. याचा निकाल राणा यांच्या बाजूने लागला. त्यामुळं राणा आणि अडसूळ यांच्यात कमालीची कटुता होती. अडसूळ यांनी मागे नवनीत राणा (Lok Sabha Election 2024) यांच्यावर 17 रुपयांच्या साडीवरूनही बरीच टीका केली होती.
’17 रुपयांच्या साड्या वाटून ह्यांनी स्वत:ची हवा निर्माण केली. लोकांनी नवरा-बायकोला बंटी आणि बबली नावं दिलीत ती विचारपूर्वक दिलीत. राजकारण सोडेन, पण त्यांचा प्रचार करणार नाही.’,असा निर्धारच आनंदराव अडसूळ यांनी केला होता. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे.
आनंदराव अडसूळ राणा यांना पाठिंबा देणार?
नवनीत राणा आणि रवी राणा हे थेट अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला गेल्याचे दिसून आलं. ‘त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे. नैतिकता नाही, अक्कल नाही. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली.’,अशी जहरी टीका करूनही राणा अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अडसूळ पित्रा-पुत्रांनी राणा (Lok Sabha Election 2024)यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. अभिजीत अडसूळ यांनी तर उमेदवारी अर्ज पण खरेदी केला होता. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग खडतर मानला जात होता. या भेटीनंतर अभिजीत अडसूळ बंड करण्याची शक्यता आता जवळपास मावळली असल्याची जोरदार चर्चा राजकारणात होत आहे. आता अभिजीत अडसूळ आणि राणा दाम्पत्य यांच्या भेटीनंतर आनंदराव अडसूळ आता तरी राणा यांच्या प्रचाराला जाणार का?, असा प्रश्न निर्माण होत आहे.त्यांनी मागे राजकारण सोडेल पण राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती.
News Title – Lok Sabha Election 2024 Navneet Rana met Abhijeet Adsul
महत्त्वाच्या बातम्या –
गुड न्यूज; गुंतवणूकरणाचे पैसे होणार दुप्पट
नवीन कार खरेदी करताय? तर अशाप्रकारे घ्या काळजी
एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून धमकीचे फोन!
विराटच्या चाहत्यांनो RCB ‘या’ वर्षी IPL ट्रॉफी जिंकणार
आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार






