शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील यांचे निधन! कोल्हापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास

On: August 4, 2026 12:37 PM
D Y Patil Passes Away
---Advertisement---

D Y Patil Passes Away | देशातील शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे शिक्षणमहर्षी ज्ञानदेव यशवंतराव पाटील (D. Y. Patil) यांचे कोल्हापूर (Kolhapur) येथे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. पद्मश्री (Padma Shri) पुरस्काराने सन्मानित असलेल्या डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षणविश्वासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

शिक्षण क्षेत्रातील भव्य कार्याचा प्रवास :

22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील आंबप या गावात जन्मलेल्या ज्ञानदेव यशवंतराव पाटील (D. Y. Patil) यांनी साध्या शेतकरी कुटुंबातून पुढे येत देशभरात वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवण्याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. सुरुवातीला काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवास सुरू केला, मात्र वयाच्या सुमारे 45 व्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर होत संपूर्ण लक्ष शिक्षण क्षेत्रावर केंद्रित केले.

1983 मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शैक्षणिक वाटचाल सुरू केली. पुढे डी. वाय. पाटील ग्रुप (D. Y. Patil Group) अंतर्गत कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे 3 हून अधिक डीम्ड विद्यापीठे, 6 खाजगी विद्यापीठे आणि 180 पेक्षा अधिक शिक्षणसंस्था उभारल्या. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर आणि कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मजबूत शैक्षणिक जाळे निर्माण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

D Y Patil Passes Away | राजकारण, क्रीडा आणि समाजसेवेतील योगदान :

डी. वाय. पाटील (D. Y. Patil) यांनी 1957 ते 1962 या काळात कोल्हापूरचे महापौर म्हणून काम केले. त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. पुढे त्यांची त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून 2009 ते 2013 आणि बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून 2013 ते 2014 या कालावधीत नियुक्ती झाली. काही काळ त्यांनी पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यांच्या कुटुंबात डॉ. संजय डी. वाय. पाटील, सतेज उर्फ बंटी पाटील, विजय डी. पाटील, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, डॉ. नंदिता पालशेतकर (Dr. Nandita Palshetkar) तसेच नातू ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.

News Title: Educationist D Y Patil Passes Away

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now