LIC चा हप्ता थकलायं? काळजी करू नका, आता बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची मोठी संधी

On: August 21, 2025 10:36 AM
LIC Scheme
---Advertisement---

LIC Lapsed Policy | भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने थकबाकीमुळे बंद (lapsed) झालेल्या पॉलिसीधारकांसाठी ‘Special Revival Campaign’ जाहीर केली आहे. ही मोहीम 18 ऑगस्टपासून सुरु झाली असून 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत अविरत चालणार आहे. या दरम्यान पॉलिसीधारकांना थकबाकी प्रीमियमासह कमी विलंब शुल्क भरून पॉलिसी पुन्हा कार्यान्वित करण्याची संधी मिळणार आहे.

या मोहिमेचा उद्देश लाखो कुटुंबांचे विमा-सुरक्षा कवच पुन्हा मजबूत करणे हा आहे. हप्ता वेळेवर न भरल्याने पॉलिसी बंद झालेल्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, विलंब शुल्कावर मिळणाऱ्या सवलतीमुळे पुनरुज्जीवनाचा खर्चही कमी होईल. (LIC Lapsed Policy)

कोण पात्र आणि कोणत्या अटी लागू? :

एलआयसीने स्पष्ट केले आहे की पहिल्या न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून 5 वर्षांच्या आत असलेल्या आणि ज्यांची पॉलिसी मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही अशा पॉलिसी या अभियानात पुनरुज्जीवित करता येतील. ही सुविधा वैयक्तिक, नॉन-लिंक्ड (Non-Linked) पॉलिसींना लागू आहे. उदाहरणार्थ, 10 वर्षांच्या वैयक्तिक, नॉन-मार्केट लिंक्ड पॉलिसीमध्ये 2021 पासून हप्ते भरले नसतील तरी एकूण पॉलिसी मुदत संपलेली नसेल, तसेच 5 वर्षांच्या आत आपण असाल तर ती पुन्हा सुरु करता येईल.

विमा पॉलिसी सामान्यतः हप्ता चुकल्यानंतरही 15 ते 30 दिवसांचा ग्रेस पीरियड देते. मात्र या काळातही हप्ता न भरल्यास पॉलिसी लॅप्स होते. अशा पॉलिसींना ‘Special Revival Campaign’मध्ये पुन्हा चालू करण्याची संधी उपलब्ध आहे.

LIC Lapsed Policy | विलंब शुल्कावर मोठी सवलत; मायक्रो-इन्शुरन्ससाठी खास लाभ :

या मोहिमेत विलंब शुल्कावर 30% सूट दिली जाईल, ज्यावर ₹5,000 ची कमाल मर्यादा असेल. यामुळे थकबाकी परत करताना ग्राहकांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो. मायक्रो इन्शुरन्स योजना असलेल्या पॉलिसींमध्ये तर विलंब शुल्कावर 100% सवलत देण्यात आली आहे, म्हणजेच विलंब शुल्क माफच राहील.

महत्वाची म्हणजे, पुनरुज्जीवनाच्या वेळी थकबाकी प्रीमियमसोबत लागू व्याज भरावे लागेल. काही प्रकरणांत वैद्यकीय अहवाल किंवा विशेष कागदपत्रे आवश्यक ठरू शकतात. अशा चाचण्यांचा खर्च पॉलिसीधारकाकडून वहन करावा लागेल.

सुविधा कशी घ्यावी? प्रक्रिया सोपी, वेळ मर्यादित :

आपली पॉलिसी लॅप्स झालेली असल्यास जवळच्या LIC शाखेशी संपर्क साधा किंवा आपल्या LIC एजंटकडून मार्गदर्शन घ्या. थकबाकी प्रीमियम, लागू व्याज आणि सवलतीनंतरचे विलंब शुल्क भरून पॉलिसी पुन्हा सुरू करता येते. आवश्यक कागदपत्रे, केवायसी आणि आरोग्य तपासण्या (लागू असल्यास) तत्काळ पूर्ण करा.

मोहीम 17 ऑक्टोबर 2025 पर्यंतच असल्याने विलंब टाळा. लवकर कृती केल्यास सवलतीचा लाभ, विमा संरक्षणाची सलगता आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचे ध्येय—हे तिन्ही साध्य होऊ शकते.

News Title: LIC Special Revival Campaign 2025: Reopen Your Lapsed Policy with 30% Late Fee Discount (Up to ₹5,000) — Micro Insurance Gets 100% Waiver

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now