नवरा बायकोमध्ये LAT रिलेशनशिपचा ट्रेंड, जाणून घ्या LAT म्हणजे नक्की काय?

On: April 21, 2025 7:41 PM
LAT Marriage trend
---Advertisement---

LAT Trend | सध्या नात्यांची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. लग्नाच्या आधी डेटिंग आणि लिव्ह-इन रिलेशनशिप सामान्य झाले आहेत, तर आता विवाहित जोडप्यांमध्येही ‘एकत्र वेगळं राहणं’ (Living Apart Together – LAT) हा नवा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. हा ट्रेंड अशा लोकांना भावतो जे विवाहानंतर स्वतंत्र आयुष्य जगण्याचा मार्ग शोधत आहेत

LAT म्हणजे काय आणि कसं असतं हे नातं?

LAT रिलेशनशिप म्हणजे जोडपं एकमेकांशी वैवाहिक नात्यात असतं, पण ते वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात. ते एकमेकांना वेळोवेळी भेटतात, एकत्र वेळ घालवतात, पण त्यांच्या व्यक्तिगत जागेची जाणीव राखतात. काही जण एकाच घरात राहूनही स्वतंत्र खोल्यांमध्ये राहणं पसंत करतात. हा ट्रेंड विशेषतः तरुण पिढीत अधिक दिसतो कारण यात वैयक्तिक स्वातंत्र्य अधिक असतं.

हे नातं दोघांनाही जवळीक देतं, पण बंधन न देता. सहजीवनातील अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि सततची उपस्थिती टाळून, नातं एका नव्या पद्धतीने टिकवण्याचा हा प्रयत्न असतो.

LAT ट्रेंड का ठरत आहे लोकप्रिय?-

स्वातंत्र्य हा या ट्रेंडचा मुख्य आधार आहे. सतत एकत्र राहताना अनेक वेळा मतभेद, हस्तक्षेप आणि तणाव वाढतो. LAT पद्धतीमध्ये दोघांनाही स्वतःची आवड-निवड जपता येते, आणि स्वतःच्या जीवनशैलीवर काम करता येतं.

करिअरकडे लक्ष देण्यासाठी, स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठीही हा ट्रेंड फायदेशीर ठरतो. याशिवाय, नात्यात नवलाई टिकते. दररोज न पाहता एखाद्या विशिष्ट वेळी भेटल्यामुळे एकमेकांबद्दल उत्सुकता आणि प्रेम जपलं जातं.

एकत्र वेगळं राहण्याचे फायदे आणि मर्यादा-

या नात्यामुळे जोडप्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आपली आवड जपताना नात्यात सुसंवाद अधिक घट्ट होतो. भावनिक दडपण, भांडणं कमी होतात आणि नातं आरोग्यदायी राहतं.

मात्र, याचे काही तोटेही आहेत. दीर्घकाळ एकमेकांपासून दूर राहताना एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. कठीण काळात एकमेकांचा आधार मिळत नाही. काही वेळा या नात्यांमध्ये भावनिक अंतर वाढतं आणि नातं अस्थिर होण्याची शक्यता असते.

News Title – LAT trend Married but Living Separately

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now