Crime News l नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अभोणा (Abhona) येथील गोळाखाल (Golakhal) येथे जमिनीच्या वादातून (Land Dispute) एका महिलेची (Woman) अंगावर ट्रॅक्टर घालून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विधवा बहिणीच्या (Widow Sister) वाटणीची दोन एकर जमीन (Two Acres Land) मला मिळायला हवी, अशी मागणी करणाऱ्या देविदास पवार (Devidas Pawar) यांच्या पत्नी जिजाबाई पवार (Jijabai Pawar) (वय 47) यांची, हेमंत सुरेश पवार (Hemant Suresh Pawar) याने हत्या केली.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातून होणाऱ्या गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपी हेमंत सुरेश पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
नेमके काय घडले? :
देविदास पवार यांनी आपल्या नातेवाईकांना, विधवा बहिणीच्या वाटणीची दोन एकर जमीन आपल्याला मिळायला हवी, असे सांगितले. यावरून वाद झाला आणि याच वादातून संतापलेल्या हेमंत सुरेश पवार याने, देविदास पवार यांच्या पत्नी जिजाबाई पवार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जिजाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
Crime News l आरोपी फरार; पोलीस तपास सुरू :
घटनेनंतर आरोपी हेमंत सुरेश पवार फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास अभोणा पोलीस करत आहेत.






