लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

On: December 5, 2025 5:02 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत या महिन्यात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डिसेंबर महिन्यात सरकारकडून महिलांना केवळ एकच नाही तर दोन हप्ते मिळू शकतात. त्यामुळे लाभार्थींच्या खात्यात 1500 रुपयांऐवजी 3000 रुपये जमा होण्याची शक्यता अधिक वर्तवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक बहीणींमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा होऊ शकतात, अशी माहिती मिळाली आली आहे. (Ladki Bahin Yojana)

नोव्हेंबरचा हप्ता थांबण्यामागे कारण काय?

डिसेंबरची सुरुवात होऊनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा सन्माननिधी जमा झालेला नाही. यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे. निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीतून अनेक आर्थिक प्रक्रिया तात्पुरत्या स्थगित केल्या जातात. त्यामुळेच यावेळी हप्ता उशिरा येत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Ladki Bahin Yojana)

गेल्या वर्षीही विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारने महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे हप्ते एकाचवेळी जमा केले होते. त्यावेळी सुमारे 3000 रुपये एका व्यवहारात जमा झाले होते. त्यामुळे यंदाही तशीच शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात हप्ता जमा होऊ शकतो. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही.

Ladki Bahin Yojana | E-KYC पूर्ण नसल्यास निधी रोखला जाऊ शकतो :

लाडकी बहीण योजनेत ई-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक महिलांची KYC अपूर्ण असल्यामुळेही त्यांचा हप्ता थांबत असल्याचे दिसून येते.

ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
– होमपेजवरील E-KYC पर्याय निवडा.
– आधार क्रमांक व कॅप्चा भरा.
– नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP सबमिट करा.
– KYC आधी झाली असल्यास त्याचा संदेश दिसेल.

जर नाव लाभार्थी यादीत नसेल तर हप्ता देखील रोखला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.

News title : Ladki bahin yojana november, december installment

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now