Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. योजनेअंतर्गत eKYC दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या महिलांकडून eKYC प्रक्रियेत चुका झाल्या होत्या, त्यांना आता दुरुस्ती करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी अधिकृत माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना eKYC दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
आता 30 एप्रिलपर्यंत eKYC दुरुस्तीची संधी :
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना eKYC प्रक्रिया करण्यासाठी सुरुवातीला सप्टेंबर 2025 मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. सुरुवातीला नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली. (Ladki Bahin eKYC Correction Date)
यानंतर काही महिलांनी eKYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र अनेक महिलांकडून अजूनही दुरुस्ती बाकी असल्यामुळे सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ देत आता 30 एप्रिल 2026 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.
Ladki Bahin Yojana | चुकीमुळे लाभ मिळण्यात अडचणी :
सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत मिळावी यासाठी अधिकृत संकेतस्थळावर eKYC सुविधा सुरू केली होती. मात्र प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीची माहिती किंवा पर्याय निवडला गेल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या.
यामुळे अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अशा महिलांना आपली माहिती दुरुस्त करण्यासाठी सरकारने विशेष संधी दिली आहे. (Ladki Bahin Yojana eKYC)
दुरुस्ती न केल्यास नाव वगळण्याची शक्यता :
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या महिलांनी अद्याप eKYC दुरुस्ती केलेली नाही त्यांनी 30 एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्यांच्या यादीतून त्यांचे नाव वगळले जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या महिलांना योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे त्यांनी दिलेल्या मुदतीतच eKYC दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






