‘लाडक्या बहिणीं’साठी धक्कादायक बातमी?; 1500 रुपयांवर सोडावं लागणार पाणी?

On: January 21, 2025 1:55 PM
Ladki Bahin Scheme  Beneficiaries May Have to Choose Between Schemes
---Advertisement---

Ladki Bahin Scheme | ‘लाडक्या बहिणीं’साठी (Ladki Bahin Scheme ) एक धक्कादायक बातमी आहे. निवडणुकीनंतर (Election) ‘लाडक्या बहिणीं’च्या विविध निकषांवर (Criteria) चर्चा सुरू झाली आहे.

अनेक महिलांचे अर्ज (Applications) निकषांमध्ये बसत नसल्याने बाद (Rejected) झाले आहेत. त्यातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे ‘लाडक्या बहिणीं’ना 1500 रुपयांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांवर आक्षेप

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या (Personal Benefit) कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी (Beneficiary) घेऊ शकतो, असा निकष आहे.

असे असतानाही, या योजनेतील अनेक लाभार्थी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निराधारांच्या (Destitute) अनुदानाला (Grant) खोडा बसत आहे. नोव्हेंबरपासून (November) अनेक निराधार महिला अनुदानाच्या रकमेच्या प्रतीक्षेत (Waiting) आहेत. (Ladki Bahin Scheme )

65 वर्षांपर्यंतच्या महिलांना द्यावे लागणार स्वयंघोषणापत्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांवर आक्षेप घेतला जात असल्याने आता 65 वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) किंवा श्रावणबाळ योजनेच्या (Shravanbal Yojana) महिला लाभार्थींना, यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा, याचे स्वयंघोषणापत्र (Self Declaration) द्यावे लागणार आहे. याचा अर्थ या महिलांना दोनपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या निर्णयामुळे अनेक महिलांना आर्थिक फटका (Financial Loss) बसण्याची शक्यता आहे. ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत होत्या, त्यांना आता एका योजनेवर पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयाविरोधात महिला संघटना (Women’s Organizations) आक्रमक (Aggressive) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Ladki Bahin Scheme )

Title : Ladki Bahin Scheme  Beneficiaries May Have to Choose Between Schemes

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now