नोकरीतून ब्रेक घेत कुंभमेळ्यात तरुणांची भरघोस कमाई; ‘या’ दोन व्यवसायांनी कमवले लाखो रूपये

On: February 20, 2025 9:26 AM
Nashik Kumbh Mela
---Advertisement---

Kumbh Mela l प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात, शेवटचा टप्पा असूनही, दररोज कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत आहेत. या प्रचंड गर्दीचा फायदा घेत स्थानिक तरुणांनी रोजगाराच्या नवीन संधी शोधल्या आहेत. शहरातील वाहतूक कोंडीमुळे मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी असल्याने, हे तरुण दुचाकीवरून भाविकांना इच्छित स्थळी पोहोचवून मोठी कमाई करत आहेत. अनेकांनी यासाठी आपल्या नोकरीतूनही रजा घेतली आहे.

दुचाकी टॅक्सींचा वाढता वापर :

शहरात मोठ्या वाहनांना प्रवेश नसल्यामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जवळपास १५ ते २० किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत आहे.

भाविकांची ही गरज ओळखून, स्थानिक तरुणांनी दुचाकी टॅक्सी (bike taxi) सेवा देण्यास सुरुवात केली आहे. हे तरुण दुचाकीस्वार, भाविकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी ४०० ते १००० रुपये घेत आहेत. यातून त्यांना दिवसाला ३००० ते ४००० रुपयांपर्यंत कमाई होत आहे. महिन्याभरात अनेकांनी यातून लाखांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे.

Kumbh Mela l नौकाविहाराचे वाढलेले दर :

पवित्र संगमावर जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने नौका (boat) आणि मोटारबोटींचा वापर करत आहेत. प्रशासनाने नौकाविहारासाठी ४५ ते १२५ रुपये दर निश्चित केले असले, तरी प्रत्यक्षात मात्र या दरापेक्षा दहापट अधिक पैसे आकारले जात आहेत.

एका व्यक्तीकडून १३०० ते १६०० रुपये घेतले जात आहेत. बोटी चालवण्यासाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमधून (Bihar) अनेक नावाडी आले आहेत, अशी माहिती बोटचालक धर्मेंद्र प्रेमचंद (Dharmendra Premchand) यांनी दिली. सामान्य परिस्थितीत ५००० बोटी उपलब्ध असतात.

News title : Kumbh Mela: Youth Earn Big with Bikes and Boats

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now