Krishna Aandhale | बीड (Beed) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. मुख्य आरोपी वाल्मीक कराड (Valmik Karad) आणि इतर काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी कृष्णा आंधळे (Krishna Aandhale) अद्याप फरार आहे. काही दिवसांपूर्वी मस्साजोग (Massajog) गावात देशमुख यांच्या घराजवळ एका अज्ञात महिलेने धाव घेत, कृष्णा आंधळेबाबत महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा करत वातावरणात खळबळ उडवली होती.
मानसिक रुग्ण असल्याचे समोर-
महिलेच्या या दाव्यानंतर संशय निर्माण झाला होता की कृष्णा आंधळे (Krishna Aandhale) तिच्यासोबत राहत होता का, मात्र आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. संबंधित महिला मानसिक आजारी असल्याचे उघड झाले असून, रत्नागिरी (Ratnagiri) पोलिसांनी तिच्या चौकशीला सुरुवात केली आहे. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांना भेटल्यानंतर ही महिला बीडहून रत्नागिरीकडे रवाना झाली होती, मात्र अद्याप ती तिथे पोहोचलेली नाही. पोलिस तपासात आढळले आहे की ही महिला रत्नागिरीजवळील खेडशी (Khedshi) गावातील एका अपार्टमेंटमध्ये राहात होती आणि तिचे कुटुंबीयही तिला मानसिक रुग्ण असल्याचे सांगतात.
महिलेच्या माहितीकडे पोलिसांचे लक्ष-
पोलिसांनी या महिलेच्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. तिच्या तावडीतून मिळणारी माहिती खरी आहे की नाही, याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात हा एक नवा धक्का मानला जात आहे आणि तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
Krishna Aandhale च्या तपासाला नवीन दिशा मिळणार का?
फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या महिलेच्या दाव्यामुळे तपासाला वेगळे वळण मिळते का, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांना लवकरच काही ठोस माहिती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






