कोथरूड हादरलं! भररस्त्यात तरूणावर कोयत्याने वार करून खून

On: January 31, 2025 11:50 AM
Indapur
---Advertisement---

Pune Crime l दुचाकीवरून (Bike) जाणाऱ्या एका तरुणावर कोयतासदृश (Machete-like) शस्त्राने वार करून त्याचा खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना कोथरूडमधील (Kothrud) सागर कॉलनी (Sagar Colony) परिसरात गुरुवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर (Attack) आरोपी (Accused) कोयते नाचवत आरडाओरडा करत पळून गेले.

भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे कोथरूड परिसरात दहशतीचे (Panic) वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी (Police) चार अल्पवयीन (Minor) आरोपींना ताब्यात घेतले आहे.

राहुल जाधव (Rahul Jadhav) असे या घटनेत मृत्युमुखी (Death) पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Pune Crime l प्रेमसंबंधाच्या संशयातून हल्ला :

प्राथमिक माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे एका तरुणाच्या आईसोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर आरोपींनी राहुलला ठार मारण्याचा कट रचून (Conspiracy) त्याच्यावर हल्ला केला.

दुचाकीवरून जात असताना तीन ते पाच जणांच्या टोळक्याने आरडाओरडा करून पालघन (कोयतासदृश शस्त्र), कोयता व अन्य शस्त्रांनी राहुलवर हल्ला केला.

या घटनेमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली असून, भररस्त्यात घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

News Title: Kothrud-Shocked-Bike-Rider-Hacked-To-Death-In-Broad-Daylight-Love-Affair-Suspected

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now