Kitchen Hacks | फळे आणि भाज्या खरेदी करणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच त्या योग्य पद्धतीने साठवणेही गरजेचे आहे. 99% महिला नकळत काही वस्तू एकत्र ठेवतात, ज्यामुळे त्या लवकर खराब होतात. फळे आणि भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी काही टिप्स आणि योग्य पद्धती माहिती असणं गरजेचं आहे.
फळे आणि भाज्या साठवताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या.
काही फळे हा वायू उत्सर्जित करतात, तर काही भाज्या त्या वायूला संवेदनशील असतात. कोथिंबीर, मेथी किंवा पालक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यापूर्वी कधीही धुवू नका. धुण्यामुळे त्यातील ओलावा वाढतो आणि भाज्या कुजतात. या भाज्या निवडून एका सुती कापडात किंवा कागदाच्या पिशवीत गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे त्या आठवडाभर ताज्या राहतात. हिरव्या मिरच्यांचे देठ काढून टाका. देठामुळे मिरच्या लवकर खराब होतात. देठ काढल्यानंतर त्या कागदात गुंडाळून प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. लिंबू जास्त काळ रसाळ ठेवण्यासाठी त्यांना थोड्या तेलाचा हात लावून झिपलॉक बॅगमध्ये ठेवा किंवा पानाच्या डब्यात ठेवा.
कोणत्या भाज्या फळे एकत्र ठेवायची नाहीत?
कांदा आणि बटाटा एकत्र ठेवायचा नाही. कांद्यामुळे बटाट्यांना मोड येतात, तर बटाट्यामुळे कांदा कुजतो. सफरचंद आणि गाजर एकत्र ठेवायचं नाही. सफरचंदामुळे गाजराची चव कडू होऊ शकते. केळी आणि इतर फळे केळी खूप इथिलीन सोडतात, ज्यामुळे जवळची फळे अति-पिकून खराब होतात. टोमॅटो आणि काकडी एकत्र ठेवायची नाहीत. टोमॅटोमुळे काकडी लवकर पिवळी पडते आणि मऊ होते.
अधिक काळ ताजेपणा टिकवण्यासाठी 3 ‘गोल्डन रूल्स’
फ्रिजरेटरमध्ये भाज्या ठेवताना त्या पूर्णपणे कोरड्या असाव्यात. ओलावा हा बॅक्टेरिया वाढण्याचे मुख्य कारण आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्याऐवजी सच्छिद्र नेट बॅग्स (Net bags) किंवा सुती पिशव्यांचा वापर करा. फ्रिजमध्ये फळांसाठी आणि भाज्यांसाठी दिलेले वेगवेगळे ड्रॉवर्स वापरा. त्यांना कधीही एकाच मोठ्या पिशवीत एकत्र कोंडू नका.






