Anganwadi Food l सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये (Smart Anganwadi) विद्यार्थ्यांना पोषण आहार (food) दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने पचायला सोपे पदार्थ असतात. मुलांचा वयोगट लक्षात घेता हे पदार्थ जास्त तेलकट, तुपकट किंवा तिखट नसतात. परंतु केरळमधील (kerala) एका अंगणवाडीत एक वेगळीच घटना घडली. अंगणवाडीतील बेचव उपम्यामुळे एका लहानग्याचे डोके अक्षरशः भंजाळून गेले आणि त्याने थेट मोठीच मागणी केली. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षण खात्याला घाम फुटला. त्यानंतर महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांनी अंगणवाडीच्या जेवणात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला.
थरनूल एस. शंकर, ज्याला त्याची आई लाडाने शंकु अशी हाक मारते, त्याने त्याच्या आईकडे अंगणवाडीतील जेवणाविषयी गोड शब्दात तक्रार केली. जेवणात नेहमी उपमा मिळत असल्याने तो नाराज होता. “मला अंगणवाडीत बिर्याणी किंवा चिकन फ्राय (chicken fry) हवे, उपमा नको”, असा हट्ट त्याने धरला. त्याच्या आईने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या व्हिडिओची दखल राज्याच्या आरोग्य, महिला आणि बाल कल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली.
Anganwadi Food l केरळच्या (keral) महिला आणि बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले. त्यानंतर त्यांनी अंगणवाडीच्या (Agananvadi) आहारात मुलांना कोणते पदार्थ दिले जातात, याची माहिती घेतली. सर्वच अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि पौष्टिक पदार्थ दिले जातात की नाही, याचा तपास करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या नवीन बदलामुळे कदाचित शंकुला त्याच्या आवडीचे पदार्थ अंगणवाडीत मिळू शकतील.
केरळ सरकारने राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे रूपडे पालटण्याचा निर्णय घेतला आहे. आता अंगणवाड्या स्मार्ट (Smart Anganwadi) करण्यात येणार आहेत. यामध्ये अभ्यासिका, विश्रांती कक्ष, स्वयंपाकघर, भांडारगृह, बाग, मुलांना ऋतुमानानुसार खेळण्यासाठी घरातील आणि बाहेरील खेळांचा समावेश असेल. तसेच अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांचे मानधन देखील वाढवण्यात येणार आहे.






