Kashmiri Driver l पहलगाम (Pahalgam attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, काश्मीरमधून माणुसकीचा एक जिवंत आणि हृदयस्पर्शी किस्सा समोर आला आहे. नाशिकहून पर्यटनासाठी गेलेल्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे (rupali thombre) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्थानिक मुस्लिम ड्रायव्हर आदिलभाईंनी मदतीचा हात दिला, आणि त्यांनी जे दाखवून दिलं ते म्हणजे “धर्म नाही, माणुसकी महत्वाची!”
“आदिलभाईंनी घरी नेऊन जेवायला घातलं… डोळ्यात पाणी आलं” – रूपाली ठोंबरे :
रुपाली ठोंबरे (Rupali thombare) यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी आदिलभाईंनी (adilbhai) दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञतेने सांगितलं. त्या म्हणाल्या, “आदिलभाईंनी आम्हाला घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुरक्षित एका हॉटेलमध्ये पोहोचवलं. या प्रसंगी त्यांचं माणुसकीचं मोठेपण पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.”
आदिलभाईंनीही या व्हिडीओत सांगितलं, “माझा धंदा संपला, पण माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. आम्ही लोनवर गाड्या घेतल्या आहेत, आता कुणीही इथं येणार नाही. पण माणसं वाचवणं हेच खरं काम.”
Kashmiri Driver l “पर्यटकांना विमानाने बाहेर काढा” – सरकारला ठोंबरे यांची विनंती :
रुपाली ठोंबरे (rupa;i thombre) यांनी सरकारकडे विनंती केली आहे की, “आपण दहशतवाद्यांवर कारवाई कराच, पण पर्यटकांना तातडीने विमानाने घरी पोहोचवण्याची सोय करावी. अनेक लहान मुले आमच्यासोबत आहेत, आणि परिस्थिती अत्यंत बिकट आहे.”
“ज्यांनी हे कृत्य केलं ते हैवान आहेत” – आदिलभाईंचा रोष :
दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आदिलभाईंनी म्हटलं, “ही माणुसकीची हत्या आहे. काही जण चुकीचं कृत्य करतात आणि आमच्यासारखे अनेक लोक बदनाम होतात. हे दु:ख शब्दांत मांडता येणार नाही.”
या घटनेवर प्रतिक्रिया देताना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी लिहिलं – “हिंदू संकटात असताना काश्मिरी मुस्लिम मदतीला धावून आले. हे दहशतवाद्यांनो, बघा – माणुसकी अजूनही जिवंत आहे.” त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधत म्हटलं की, “हा हल्ला धर्मावर नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आहे.”






