‘आम्हाला शांतता हवी!’ पहलगाम हल्ल्याविरोधात काश्मिरी जनतेचा आक्रोश

On: April 23, 2025 8:36 PM
Kashmir Terror Attack protest of Kashmiris  
---Advertisement---

Kashmir Terror Attack | पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक नागरिकांनी या हिंसाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून ठाम भूमिका घेतली आहे. ‘आम्हाला दहशतवाद नको, आम्हाला शांतता आणि बंधुत्व हवे’ अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. (Kashmir Terror Attack )

हल्ल्यानंतर निषेध मोर्चा 

26 निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असतानाच, काश्मीरमधूनही या हिंसक कृत्याचा जोरदार निषेध नोंदवला जात आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये स्थानिकांनी कँडल मार्च काढले. विविध ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी ‘हिंसाचार थांबवा’, ‘काश्मीर पवित्र आहे, ते असंच राहू द्या’ अशा घोषणा देत दहशतवादाविरोधात आवाज उठवला.

या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले की, “पर्यटक आमच्यासाठी देवतुल्य आहेत. आम्ही त्यांचे रक्षण करणार. हिंसाचारामुळे आमचा पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त होतो. आम्हाला यापुढे शांततेचा काश्मीर हवा आहे.” सोशल मीडियावरून समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये हे दृश्य स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

भारत सरकार अलर्ट मोडवर

एक व्हायरल व्हिडीओ विशेष चर्चेत आहे, ज्यामध्ये एक मराठी भाषिक तरुणी काश्मीरच्या रस्त्यांवरून नागरिकांसोबत आवाज उठवताना दिसते. तिच्या मागे स्थानिक नागरिक “हिंसाचार थांबवा”, “भारताचं अखंडत्व टिकवूया” असे संदेश देताना दिसत आहेत. या नागरिकांनी जाहीरपणे बंधुतेचा संदेश देत शांतता आणि सौहार्द यावर भर दिला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी एकत्र येत, हिंसेचा निषेध करत रस्त्यावर मोर्चा काढला आहे.  दरम्यान, या हल्ल्यानंतर भारत सरकार अलर्ट मोडवर गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सौदी अरेबियातील दौरा तात्काळ थांबवत देशात परत येत दिल्लीमध्ये महत्त्वाच्या सुरक्षाविषयक बैठकींना सुरुवात केली आहे. लवकरच केंद्र सरकारकडून या हल्ल्यावर अधिकृत आणि निर्णायक भूमिका स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.

Title : Kashmir Terror Attack protest of Kashmiris  

 

 

Join WhatsApp Group

Join Now