Kashika Kapoor | बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण-तरुणी मुंबईत पाऊल ठेवतात. मात्र, या इंडस्ट्रीचा झगमगाट जितका भासतो, तितकाच अंधारही त्यामागे लपलेला असतो. ‘आयुष्मती गीता मॅट्रिक पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काशिका कपूर (Kashika Kapoor) हिनेदेखील याचा अनुभव घेतला. एका मुलाखतीत तिने आपल्या संघर्षाचा आणि कास्टिंग काउचचा अनुभव उघडपणे शेअर केला.
कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव
काशिकाने सांगितलं की, तिने १५० पेक्षा अधिक ऑडिशन्स दिल्या, परंतु दरवेळी नकार मिळाला. त्या संघर्षाच्या काळात एका मध्यरात्री, तिला रात्री ३ वाजता एका डायरेक्टरचा फोन आला. त्या व्यक्तीने काम देण्याचं आमिष दाखवून, त्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.
काशिका म्हणाली, “त्याने थेट सांगितलं – काम देतो, पण त्याआधी तुला माझ्यासोबत झोपावं लागेल.” हा अनुभव तिला हादरवून गेला, पण तिने त्याला ठामपणे नकार दिला. तिच्या म्हणण्यानुसार, “दहा वर्षांनी जेव्हा मी स्वतःकडे बघेन, तेव्हा माझ्या नजरेत अपराधीपणा नसावा, हीच माझी प्रेरणा होती.”
आईच्या पाठिंब्यामुळे खंबीरपणे उभं राहिलं स्वप्न
काशिकाच्या यशामागे तिच्या आईचा मोलाचा वाटा आहे. ती सांगते, “आई नेहमी म्हणायची – हार मानायची नाही.” आईच्या प्रेरणेमुळे आणि तिच्या शिकवणुकीमुळेच काशिकाने कोणताही शॉर्टकट न घेता प्रामाणिकपणे मेहनत घेतली. आज तिचा पहिलाच चित्रपट ‘आयुष्मती गीता मॅट्रिक पास’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे आणि तिच्या अभिनयाचं कौतुकही होत आहे.
काशिका पुढे म्हणते, “या इंडस्ट्रीत काही लोक इतके बिनधास्त असतात की, रात्री उशिरा मुलींना अशा अश्लील ऑफर्स देतात. त्यांना लाज वाटत नाही का?” तिच्या या धाडसी वक्तव्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळाली आहे.
Title: Kashika Kapoor Exposes Midnight Casting Couch Call






