“त्यांच्या पैशांवर नाचणाऱ्या, गाणाऱ्या बायकांचा…’; करूणा शर्मांनी सगळंच सांगितलं

On: April 10, 2025 4:36 PM
Karuna Sharma
---Advertisement---

Karuna Sharma | कोर्टाने दिलेल्या निकालानंतर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मी नाचणारी ठेवलेली बाई नाही’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या वैवाहिक नात्याचा दावा पुन्हा एकदा ठामपणे मांडला आहे. मंत्रीपद गमावल्यावर आता आमदारकीही जाईल, असा इशारा देत त्यांनी भावनिक आणि गंभीर आरोपांची मालिका उघडली आहे.

कोर्टाच्या निकालानंतर संतप्त प्रतिक्रिया

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी आपले वैवाहिक संबंध असल्याचे कोर्टाने स्पष्ट केल्यानंतर, करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी माध्यमाशी संवाद साधताना, या नात्याचे सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरील परिणाम स्पष्टपणे मांडले. त्यांनी ठामपणे सांगितले की, “मी कुठल्याही प्रकारे खालच्या स्तरावर गेलेली महिला नाही. दोन मुलांची आई असून, त्यांच्यावर मी प्रामाणिकपणे प्रेम केलं आहे. कोर्टाने मला नवऱ्याप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे.”

करुणा शर्मा यांनी अधिक स्पष्ट केलं की, त्यांनी तब्बल २७ वर्षे या नात्याला साथ दिली. स्वतःचं मंगळसूत्र गहाण टाकून संसार चालवला. मात्र आता त्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी इतर महिलांमध्ये रममाण होण्याचा मार्ग स्वीकारला. “त्यांच्या पैशांवर नाचणाऱ्या, गाणाऱ्या बायकांचा मेळा जमला आहे, पण मी कोर्टात माझ्या बाजूने सगळी कागदपत्रे सादर करणार आहे,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

गंभीर आरोप, भावनिक उद्रेक

करुणा शर्मा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील दु:खद प्रसंग देखील उलगडले. त्यांनी सांगितले की, “माझ्या आईने आत्महत्या केली होती. २००८ मध्ये मीही विष घेऊन आयुष्य संपवायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर माझ्या वहिनीसोबत बलात्कार झाला. आमच्यावर कायम मानसिक दबाव टाकला जातो. ही क्रूरता आता संपायला हवी.”

तसेच त्यांनी आरोप केला की, धनंजय मुंडे यांच्याजवळ कोट्यवधी रुपयांची संपत्ती कुठून आली? “त्यांच्याकडे हेलिकॉप्टर, वेश्या, आलिशान आयुष्य आहे आणि मी मात्र दोन मुलांसह कोर्टाच्या चकरा मारतेय. यांना समाजात राहण्याची लायकी नाही. आता फक्त ट्रेलर होता, पुढे अजून मोठा धक्का बसणार आहे,” असा खळबळजनक इशारा करुणा शर्मा यांनी दिला आहे.

Title: Karuna Sharma’s Explosive Allegations on Munde

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now