‘आमचं ठरलेलं, दोघींनी मिळून…’; राजश्री मुंडेंबाबत करूणा शर्मांचा मोठा खुलासा

On: April 1, 2025 7:21 PM
Karuna Sharma
---Advertisement---

Karuna Sharma | माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या वकिलांनी न्यायालयात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यासोबत अधिकृत लग्न झाले नसल्याचा दावा केल्यानंतर, आता करुणा शर्मा यांनी एका मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे. यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याशी आपली भेट कशी झाली, प्रेम कसे जुळले, लग्नात कोणते अडथळे आले आणि आपणच त्यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करण्यासोबतच, हे प्रकरण मिटवण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही केला आहे.

भैय्यू महाराजांच्या आश्रमातील भेट

करुणा शर्मा यांनी मुलाखतीत सांगितले की, धनंजय मुंडे यांना त्या पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षे होते. इंदूर (Indore) येथील भैय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आश्रमात त्या आपल्या आईसोबत गेल्या असताना त्यांची आणि धनंजय मुंडे यांची अपघाताने टक्कर झाली आणि ओळख झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते, अगदी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) देखील, त्या आश्रमात येत असत. “मी आईसोबत भय्युजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले होते, त्यावेळी धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघाताने मी धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडले,” असे शर्मा (Karuna Sharma) म्हणाल्या. त्यांच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडे यांनाही सर्व माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.

पुढे त्यांनी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आईकडे लग्नाची मागणी घातली होती, परंतु त्यांच्या घरचे सुरुवातीला तयार नव्हते. लग्नापूर्वीच आपण गर्भवती (Pregnant) असल्याचेही त्यांनी सांगितले. लग्नासाठी जात असताना शंभर ते दीडशे गुंडांनी आणि पोलिसांनी गाडी अडवून लग्नात अडथळे आणल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक अडचणींनंतर अखेर इंदूरमध्ये लग्न झाल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. लग्नानंतर मुंडे त्यांच्यावर खूप प्रेम करत होते आणि आठवड्यातून दोन वेळा पुण्याहून इंदूरला येत असत. आपण त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटल्याचे आणि मुंडे यांनी आपले आई-वडील वारल्याचे सांगितल्याचे शर्मा म्हणाल्या.

Karuna Sharma यांचे राजश्री मुंडेंशी संबंध कसे?

धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे (Rajashri Munde) यांच्यासोबतच्या नात्यावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, “राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आहे. आमच्या दोघींचं नातं चांगलं होतं, आमच्यात कसलेही प्रॉब्लेम्स नव्हते. दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचं, असं ठरलं होतं.” त्यांनी आपणच मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचाही दावा केला. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एचडीएफसी बँकेतील (HDFC Bank) जॉईंट अकाऊंट, मुंडे यांच्या एक कोटी रुपयांच्या पॉलिसीसाठी आपण नॉमिनी असल्याचे आणि आपल्या सर्व कागदपत्रांवर ‘करुणा धनंजय मुंडे’ असेच नाव असल्याचे पुरावे म्हणून सांगितले.

सर्वात खळबळजनक दावा करताना त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे आणि त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आणि ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ (Live-in Relationship) मान्य करण्यासाठी त्यांना ५० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. “परंतु आपण वकिलांकडून सगळी कागदपत्र वाचली आणि त्यासाठी नकार दिला,” असे त्यांनी स्पष्ट केले. “माझा नवरा कर्तृत्ववान आणि चांगला होता, परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्यांना घेरलं आणि संकटं आली. माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरुच राहणार आहे,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यांमुळे आणि आरोपांमुळे मुंडे-शर्मा प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now