Krishna Andhale l सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 50 दिवसांहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस (Police), एसआयटी (SIT) आणि सीआयडी (CID) अपयशी ठरले आहेत. त्यातच, करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी कृष्णा आंधळेचा खून झाला असावा, असा खळबळजनक संशय व्यक्त केला आहे.
करुणा शर्मांचा गंभीर आरोप
करुणा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “वाल्मिक कराडने (Valmik Karad) मला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोर मारहाण केली. माझ्या शरीराला त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तीन वर्षांपूर्वी मी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) गेले होते, तिथे हा प्रकार घडला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मी जिल्हाधिकारी कार्यालयाला मागितले, पण ते अद्यापही देण्यात आलेले नाही.” त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
Krishna Andhale l ‘कृष्णा आंधळेला मारून टाकलं असेल’:
“कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार आहे. त्याची हत्या झाली असावी. वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील, तर कृष्णा आंधळे याला देखील मारून टाकलं असेल,” असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.
“वाल्मिकचे बँकेत 100 खाती आहेत. त्याने बँकेच्या खात्यांमधून पैसा वळवला असेल. धनंजय मुंडे यांच्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत. माझ्याकडे त्यांच्या संदर्भात अनेक आर्थिक गैरव्यवहारांची माहिती आहे. वेळ आली तर मी सगळी माहिती बाहेर काढेन,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. “संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची मी मागणी केली आहे. कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून, आता अशोक मोहिते (Ashok Mohite) प्रकरणातील दोघेजण कर्नाटकमध्ये (Karnataka) पकडले आहेत. ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. म्हणजे अजूनही माज संपलेला नाही. अजूनही अशोक मोहिते शुद्धीत नाहीत. या प्रकरणात कलम वाढ करायला हवी,” अशी मागणी करतानाच कृष्णा आंधळे लवकरच सापडेल, असे सुरेश धस यांनी सांगितले.






