Kareena Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या पती सैफ अली खान (Saif Ali Khan) वर 16 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या बांद्रा येथील घरी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आता, 23 दिवसांनंतर, करीना कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लग्न, घटस्फोट, मानसिक तणाव आणि मुलांच्या संगोपनावर भाष्य केले आहे.
लग्न आणि तणावावर वक्तव्य-
करीना कपूरने (Kareena Kapoor) आपल्या पोस्टमध्ये लग्न आणि घटस्फोटासोबतच आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित संकटांवर प्रकाश टाकला. ती म्हणाली, “जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत मोठी घटना घडते, तेव्हा आपल्याला जीवनातील खरी किंमत कळते. लग्न, घटस्फोट, चिंता, मूल जन्माला येणं किंवा कोणाच्या मृत्यूचा आघात – या गोष्टी आपण स्वतः अनुभवल्याशिवाय पूर्णतः समजू शकत नाही.”

याआधी सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूरने (Kareena Kapoor) माध्यमांना त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं. तिने सांगितलं की, “हा आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण काळ आहे. आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरत आहोत.”
सैफवरील हल्ला –
15 जानेवारीच्या रात्री, सैफ अली खान यांच्या घरात एक अज्ञात हल्लेखोर घुसला आणि त्यांच्यावर चाकूने सहा वेळा वार केले. गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
या प्रकरणावर मुंबई पोलिसांवर मोठा दबाव होता. अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अखेर मोहम्मद शहजाद (Mohammad Shehzad) याला मुख्य आरोपी घोषित करण्यात आलं.






