‘त्या खोलीत रात्रभर…’; अभिनेत्री करिना कपूरने करिश्माबद्दल केला सर्वात मोठा खुलासा

On: March 6, 2024 8:45 PM
kareena kapoor
---Advertisement---

Kareena Kapoor | बेबो आणि लोलो या दोघींनी सुद्धा बी टाऊन चांगलंच गाजवलं आहे. बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. तर बहिण लोलो म्हणजेच करिश्मा कपूरसुद्धा चर्चेत असते. सोशल मीडियावर दोघींची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आपल्या चाहत्यांसाठी करिना आणि करिश्मा कपूर कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. एवढंच नाही तर अनेक शोमध्ये करिनाने तिच्या खासगी आयुष्याबदल चर्चा केली. दरम्यान, बहिण करिश्माबद्दल करिनाने मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली करिना?

करिना (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर या दोघींच्या नात्याबदल सर्वांनाच माहित आहे. कोणत्याही कार्यक्रमात दोघी कायम सोबत असतात. दरम्यान, करिश्माबद्दल करिनाने एक कार्यक्रमात खुलासा केला होता. करिना म्हणाली की, करिश्माने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून मी तिला जवळून पाहिलं आहे. बाॅलिवूडमध्ये तिचा संघर्ष देखील मी पाहिला आहे. मी करिश्माला रात्रभर आईसोबत एका खोलीत रडताना पाहिलं आहे. तिच्या मनात कायम एक भीती असायची, ती बॉलिवूडमध्ये यशस्वी होईल की नाही?

पुढे करिना म्हणाली की, लहान असल्यामुळे काही गोष्टी माझ्या समोर होत नव्हत्या. पण मी दोघींना वाईट परिस्थितींचा सामना करताना पाहिलं आहे. सांगायचं झालं तर, करिश्मा हिला बॉलिवूडमध्ये यश तर मिळालं, पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक अडचणींचा सामना केला आहे.

बोलत असताना करिना (Kareena Kapoor) म्हणाली की, करिशमाचं लग्न एका उद्योजकासोबत झालं मात्र, कायम होत असलेल्या मतभेदामुळे ते फार काळ नाही टिकलं. दोघांनी विचार केल्यानंतर, अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा तिच्या दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. करिश्मा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

‘मर्डर मुबारक’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार-

करिश्मा लवकरच ‘मर्डर मुबारक’ (Murder Mubarak) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा हिची चर्चा रंगली आहे.

News Title : kareena kapoor reveals truth about karisma

महत्त्वाच्या बातम्या-

महाशिवरात्रीला महादेवाला करा ‘या’ वस्तू दान, आपल्या इच्छा आकांक्षा होतील सफल

डाळिंबाच्या रसाचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!

मराठी अभिनेत्री जुई गडकरीला विचारली जात, जुईने दिलं सडेतोड उत्तर

‘अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला भांडी देखील घासली असती’, राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल

अंबानींच्या कार्यक्रमासाठी परदेशी कलाकारांनी घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now