कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ रस्ता 5 दिवस बंद राहणार

On: January 31, 2025 9:35 AM
Pune News
---Advertisement---

Traffic Diversion l कल्याण-शीळफाटा (Kalyan-Shilphata) रस्त्यावरील पलावा जंक्शन (Palava Junction) जवळील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या (Nilje Railway Flyover) कामासाठी 5 फेब्रुवारी रात्री 12 ते 10 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत या पाच दिवसांच्या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक (Traffic) बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे (Traffic Department) पोलीस उपायुक्त (DCP) पंकज शिरसाट (Pankaj Shirsat) यांनी दिली आहे.

दहावी (10th), बारावीच्या (12th) परीक्षा (Exams) तोंडावर आलेल्या असताना पुलाच्या कामासाठी अट्टाहास कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.

पलावा पुलाच्या दोन्ही बाजूचे भूसंपादन (Land Acquisition) झाले आहे. तो पूल पहिला सुरू करा व नंतर पुढचे काय ते ठरवा, असे मनसेचे (MNS) माजी आमदार (Former MLA) राजू पाटील (Raju Patil) म्हणाले.

या 5 दिवसांच्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) सुटण्यास मदत होणार आहे.

Traffic Diversion l पर्यायी मार्ग-

– कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा.

– शिळफाटामार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने जावे.

– बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहनांनी काटई नाका येवे न येता खोणी गावात वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे.

– हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकित येऊन इच्छित स्थळी जावे

– बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी काटई नाका येथे न येता खोणी गाव येथे खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजा क्राँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे.

या कालावधीत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना या मार्गावरुन प्रवेश बंद राहणार आहे. दिलेल्या मार्गाशिवाय इतर मार्गाचा वापर वाहनांनी करु नये त्यासोबतच सूचनांचे पालन करण्याचे अवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले आहे.

News Title: Kalyan-Shilphata-Traffic-Closed-For-5-Days-From-5th-February-For-Flyover-Work-Use-Alternate-Routes

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now