जिओचा पुन्हा एकदा धमाका! नवीन सुपरहिट प्लॅन लाँच, फायदे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

On: January 27, 2025 12:19 PM
Jio Recharge
---Advertisement---

Jio Prepaid Recharge | भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आदेशानुसार, रिलायन्स जिओने (Jio Prepaid Recharge) आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये (Prepaid Recharge Portfolio) व्हॉइस आणि एसएमएस प्लॅनचा (Voice and SMS Plans) समावेश करण्यास सुरुवात केली आहे.

अलीकडेच कंपनीने ४५८ रुपये आणि १९५८ रुपयांचे दोन व्हॅल्यू पॅक (Value Packs) लाँच केले होते. मात्र, आता कंपनीने या लिस्टमधून १९५८ रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे.

या प्लॅनऐवजी कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत १७४८ रुपये आहे. या दोन्ही प्लॅन्सचे फायदे (Benefits) वेगळे आहेत. नवीन प्लॅन जुन्या प्लॅनच्या तुलनेत कमी फायदे देतो.

जिओचा नवीन १७४८ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये १७४८ रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन १९५८ रुपयांच्या प्लॅनची जागा घेईल. नवीन प्लॅन ३३६ दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो. तर, १९५८ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना एकूण १ वर्ष म्हणजे ३६५ दिवसांची वैधता देत होता. (Jio Prepaid Recharge)

१७४८ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची (Unlimited Voice Calling) सुविधा देतो. मोफत कॉलिंग ३३६ दिवस मिळेल. तसेच, या प्लॅनमध्ये ३६०० एसएमएसची (SMS) सुविधा मिळते. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये JioCinema, JioTV आणि JioCloud चे फायदे मिळतात. हा नवीन प्लॅन ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे देतो. विशेष म्हणजे ट्रायने अशा व्हॅल्यू प्लॅनमध्ये इतर कोणतेही अतिरिक्त फायदे न देण्यास सांगितले आहे.

जुन्या आणि नव्या प्लॅनमधील फरक

जुन्या १९५८ रुपयांच्या प्लॅनमधील फायदे आणि १७४८ रुपयांच्या प्लॅनचे फायदे सारखेच आहेत. जुन्या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देण्यात आले होते. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये ३६०० एसएमएस मोफत पाठवण्याची सुविधा होती. दोन्ही प्लॅनमध्ये फरक फक्त वैधता आणि किंमतीचा आहे. (Jio Prepaid Recharge)

Title: Jio Prepaid Recharge new 1748 rupees plan replaces 1958 rupees plan

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now