Aishwarya Rai | सध्या अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या वैवाहिक नात्यात अडचणी आल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, सासू जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्या सून ऐश्वर्याचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत, ज्यामुळे ऐश्वर्या भावुक झाली होती.
ऐश्वर्या रायला रडू कोसळलं
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ २००७ सालच्या फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) सोहळ्यातील आहे, जो ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नापूर्वीचा आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्याचे कुटुंबात स्वागत करत आहेत. त्यावेळी त्यांनी ऐश्वर्याच्या मूल्यांचे, प्रतिष्ठेचे आणि सुंदर हास्याचे कौतुक केले होते. “मी पुन्हा एकदा एका प्रेमळ मुलीची सासू होणार आहे… मी तुझं कुटुंबात स्वागत करते आणि तुझ्यावर खूप प्रेम करते,” असे जया म्हणाल्या होत्या, जे ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आले होते.
यापूर्वी ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या कार्यक्रमातही जया बच्चन यांनी ऐश्वर्याच्या स्वभावाचे कौतुक केले होते. “ऐश्वर्या स्वतः एक मोठी स्टार असूनही कुटुंबात असताना ती कधीही बडेजावपणा करत नाही, ती शांतपणे सर्वांच्या मागे राहते. ती गोष्टी लक्षपूर्वक ऐकते आणि समजून घेते. ती कुटुंबात पूर्णपणे मिसळून गेली आहे,” असे गौरवोद्गार जया यांनी काढले होते.
ऐश्वर्या-अभिषेक यांच्यात दुरावा
एकेकाळी ऐश्वर्याचे कौतुक करणाऱ्या जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात आता मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत, ज्यामुळे व्हायरल व्हिडिओची अधिक चर्चा होत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी २००७ मध्ये लग्न केले आणि २०११ मध्ये त्यांना कन्यारत्न आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) झाली. अनेक वर्षे सुखाने संसार केल्यानंतर आता त्यांच्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.
या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, टॅरो कार्ड रीडर गीतांजली सक्सेना (Tarot Card Reader Geetanjali Saxena) यांनी एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल भाकीत केले आहे. त्यांनी सप्टेंबर (September) महिन्यापर्यंत दोघांनी आपले नाते सांभाळल्यास पुढील अडचणी टळतील, असे म्हटले आहे. मात्र, या वेळेपर्यंत वाद न मिटल्यास विभक्त होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे, ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
Title : Jaya Bachchan’s Old Praise for Aishwarya Rai Goes Viral Amid Divorce Rumors






