Aishwarya Rai | बच्चन कुटुंब नेहमीच चर्चेत असले तरी सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर, जया बच्चन (Jaya Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांचा एक जुना भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जया बच्चन ऐश्वर्याचे जाहीरपणे कौतुक करत आहेत.
फिल्मफेअर अवॉर्डमध्ये ऐश्वर्याचं कौतुक
२००७ साली झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जया बच्चन यांनी ऐश्वर्याचं कुटुंबात स्वागत करताना तिला दिलखुलास शब्दांत गौरवलं होतं. तेव्हा जया म्हणाल्या होत्या, “पुन्हा एकदा एका प्रेमळ मुलीची सासू होणार आहे… जिच्याकडे मूल्यं, प्रतिष्ठा आणि सुंदर हास्य आहे. मी तुझं आमच्या कुटुंबात स्वागत करते, आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते.” या शब्दांनी ऐश्वर्याचे डोळे पाणावले होते.
हेच प्रेम त्या वेळच्या अनेक मुलाखतींमध्येही दिसून आलं होतं. ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोमध्ये जया बच्चन यांना ऐश्वर्याबद्दल विचारल्यावर त्यांनी तिच्या साधेपणाचं, सौम्य स्वभावाचं आणि कुटुंबात मिसळून जाण्याच्या गुणांचं विशेष कौतुक केलं होतं. त्या म्हणाल्या, “ती कधीच पुढे येत नाही, नेहमी शांत राहते आणि लोकांचं ऐकते. हे गुण मला फार भावतात.”
घटस्फोटाच्या चर्चांमध्ये व्हायरल झाला व्हिडिओ
सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यांच्या नात्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर टॅरो कार्ड रीडर गीतांजली सक्सेना यांनी नुकतीच एक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर सप्टेंबरपर्यंत दोघांनी आपले मतभेद दूर केले नाहीत, तर त्यांचं नातं संपण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, २००७ मधील जया बच्चन यांचा भावनिक व्हिडीओ पुन्हा समोर आला असून, तो त्यांच्या एकेकाळच्या घट्ट नात्याची आठवण करून देतो.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न २००७ मध्ये पार पडलं होतं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह केला. २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात आराध्या बच्चन या मुलीचं आगमन झालं.
Title : Jaya Bachchan’s Emotional Tribute to Aishwarya Rai






