“आता रडण्यासाठी अश्रू..”, ‘त्या’ प्रसंगाबद्दल जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य

On: April 10, 2024 12:59 PM
Jaya Bachchan big statement
---Advertisement---

Jaya Bachchan | अभिनेत्री जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला आता जवळपास 50 वर्ष होत आहेत. दोघेही सुखी आयुष्य सध्या जगत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाची चर्चा होत आहे. लेक अभिषेक आणि सून ऐश्वर्या यांच्यातील नात्यात कटुता आल्याच्या बातम्या काही दिवसांपासून माध्यमात झळकल्या. आता ऐश्वर्या किंवा अभिषेक नाही तर जया बच्चन यांची चर्चा होऊ लागली आहे.

‘शोले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सिलसिला’, ‘कल हो ना हो’, ‘पिया का घर’, ‘चुपके चुपके’, ‘जवानी दिवानी’ अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री जया बच्चन यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. एके काळी त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले होते. तेव्हा ‘माझ्याकडे आता रडण्यासाठी देखील अश्रू नाहीत…’ असं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं होतं. आता यामागील नेमकं कारण काय असावं, असा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तरही येथे दिलं आहे. हा प्रसंग आहे, ‘सिलसिला’ सिनेमा दरम्यानचा… हा चित्रपट त्या काळी सुपरहीट झाला होता.

‘सिलसिला’ चित्रपटातील ‘तो’ किस्सा चर्चेत

या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटादरम्यान अमिताभ आणि जया बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत खूप चर्चा झाल्या. कारण, याचवेळी त्यांच्या आयुष्यात रेखा आल्या होत्या. तेव्हा सर्वत्र रेखा आणि अमिताभ यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत होत्या.

या सिनेमामध्ये जया बच्चन यांचा एक रडण्याचा सीन होता. रडण्याचा सीन असल्यामुळे जया यांनी ग्लिसरीनची मागणी केली होती. पण, अशात सेटवरील एक व्यक्ती त्यांना म्हणाला की, ‘तुम्ही एक उत्तम अभिनेत्री आहात, तुम्हाला ग्लिसरीनची काय गरज?’, यावर जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी दिलेलं उत्तर खूपच चर्चेत आलं.

अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याच्या चर्चा

‘मी एवढी रडली आहे की आता रडण्यासाठी अश्रू शिल्लक नाहीत..’, असं उत्तर तेव्हा जया यांनी दिलं होतं. त्यांच्या या उत्तराने चाहते हैराण झाले होते. हा किस्सा आता चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या ‘व्हॉट द हेल, नव्या’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. याच ठिकाणी त्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली होती.

पॉडकास्टच्या सिक्रेट्स सेगमेंटमध्ये जया बच्चन यांना लग्नाबाबत प्रश्न करण्यात आला. यावर त्यांनी, ‘लग्नानंतर रोमान्स उरतच नाही.’, असं म्हटलं होतं. लग्नानंतर रोमान्स खिडकीच्या बाहेर चालल्या जातो, असंही जया (Jaya Bachchan) यांनी म्हटलं होतं. अशात आता ‘सिलसिला’मधील हा किस्सा आता चर्चेत आला आहे.

News Title- Jaya Bachchan big statement

महत्त्वाच्या बातम्या –

…अवघ्या 2 धावांनी सनरायझर्स हैदराबादचा विजय

पंजाबच्या पराभवामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला; हे आहेत टॉप 4 संघ

राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना

या राशीच्या व्यक्तींनी बाहेरगावी जाताना काळजी घ्यावी

मोठी बातमी! फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा

Join WhatsApp Group

Join Now