इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

On: November 21, 2025 4:40 PM
Maharashtra Govt Jobs
---Advertisement---

ISRO Apprentice 2025 | भारतीय विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. इस्रोच्या (ISRO) स्पेस ॲप्लिकेशन सेंटरने विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिससाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. १० वी उत्तीर्ण, डिप्लोमा तसेच ग्रॅज्युएट उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सरकारी क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी हा उत्तम पर्याय ठरणार आहे.

या अप्रेंटिसशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा स्टायपेंड मिळणार असून हा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. ISRO अप्रेंटिस प्रमाणपत्राची इंडस्ट्रीमध्ये मोठी प्रतिष्ठा असल्यामुळे भविष्यात सरकारी आणि प्रायव्हेट दोन्ही नोकऱ्यांसाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे.

३ श्रेणींमध्ये अर्जाची संधी :

ISRO ने एकूण तीन प्रकारच्या अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये पदवीधरांसाठी Graduate Apprentice, डिप्लोमा धारकांसाठी Technician Apprentice आणि ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी Trade Apprenticeची संधी उपलब्ध आहे. या तीन श्रेणींमध्ये एकूण २८ ट्रेड्समध्ये अप्रेंटिसशिपची संधी दिली जाणार आहे.

Graduate Apprentice पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चर, बीकॉम, बीसीए, लायब्ररी सायन्स, BSW आणि BA (हिंदी/इंग्रजी)मधून 60% गुण असणे बंधनकारक आहे. Technician Apprentice साठी संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक आहे. तर Trade Apprentice साठी १० वी पास आणि ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.

४ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी :

ISRO च्या अप्रेंटिससाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांना ४ डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट careers.sac.gov.in उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या अप्रेंटिस कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दादरा-नगर हवेली आणि दमन-दीव येथील विद्यापीठांतून डिग्री, डिप्लोमा किंवा ITI केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोव्हेंबर २०२२ नंतर उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज मान्य होणार नाही.

निवड प्रक्रिया व स्टायपेंड :

या अप्रेंटिस भरतीमध्ये कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही. निवड फक्त मेरिट आणि शैक्षणिक गुणांवर आधारित असेल. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी योग्य गुण आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे.
स्टायपेंड खालीलप्रमाणे मिळणार आहे:

Graduate Apprentice: ₹12,300 प्रतिमहिना
Technician Apprentice: ₹10,900 प्रतिमहिना
Trade Apprentice: ₹10,560 प्रतिमहिना

अप्रेंटिस कालावधी एक वर्षाचा असणार असून निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभरात १.२० लाखांपेक्षा जास्त स्टायपेंड मिळू शकते.

News Title: ISRO Apprentice Recruitment 2025: Apply Online for Graduate, Diploma & ITI Posts | Stipend up to ₹12,300

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now