“अजूनपण सांगतो नारळ द्या….,” मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

On: April 15, 2024 8:18 PM
IPL 2024
---Advertisement---

IPL 2024 | सध्या आयपीएलचा (IPL 2024) थरार सुरू आहे. नुकताच मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा सामना पार पडला आहे. या सामन्यामध्ये मुंबईला चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. सुरूवातीला आधी रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्यात आल्यानं चाहते संतापले. त्यानंतर पांड्याला कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली. मात्र पांड्याच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्सला चार वेळा पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या सामन्यात मुंबईला 20 धावांचा पराभवाचा सामना करावा लागला. (IPL 2024)

प्रथम चेन्नईनं फलंदाजी करत मुंबई इंडियन्स संघाला 206 धावा करत 207 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने 20 षटक खेळत 6 खेळाडू गमावत 186 धावा करता आल्या. शेवटच्या 20 धावांनी संघ पराभूत झाला. मुंबई इंडियन्स संघाला हार पचवता आली नाही. मुंबईच्या चौथ्या पराभवानं एका मराठी अभिनेत्यानं पोस्ट केली आहे. सध्या ती पोस्ट अधिक चर्चेत आहे. (IPL 2024)

“शेवटी त्याच २० धावांनी हरलो…”

मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवानंतर अनेक चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी पांड्याला पुन्हा ट्रोल केलं. मात्र अशातच आता मराठी अभिनेता जीव माझा तुझ्यात गुंतला फेम सौरफ चौगुलेनं एक पोस्ट केली होती. “शेवटी त्याच 20 धावांनी हरलो…अजून पण सांगतोय नारळ द्या…”, असं त्याने म्हटलंय. धोनीच्या शेवटच्या 20 धावांमुळे सामना हरला असल्याचं अभिनेत्याचं म्हणणं आहे. (IPL 2024)

Saorabh Choughule 1

“बॅटला बॉल नाही लागला तर…”

अभिनेता सौरफ चौगुलेनं पुन्हा दुसरी पोस्ट केली. “बॅटला बॉल नाही लागला तर Wide आहे ओरडायचो. लहानपणी तसंच काहीस वाटलं, जेव्हा त्यानं Review घेतला.” असं दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं असून पोस्ट चर्चेत आहे.

Saorabh Choughule

‘जीव माझा गुंतला’ या मालिकमध्ये त्यानं मल्हार नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. ती मालिका प्रेक्षकांच्या मनाला भावली. त्यानंतर आता सौरफ चौगुलेनं ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’, या मालिकेत पाहायला मिळत आहे. त्याने धनंजय पात्राची भूमिका साकारली आहे.

News Title – IPL 2024 In Marathi Actor Saurabh Chougule Taunt On Mumbai Indians

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात जाणार?

वारंवार थकवा येतोय?, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता अशू शकते; आहारात करा याचा समावेश

iPhone 15 वर मिळतंय तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

राज्यात अवकाळी पावसानंतर आता उष्णतेच्या लाटेचा इशारा!

“सलमान भारतातील सर्वांत मोठा गँगस्टर, त्याने..”, ‘या’ अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now