“सलमान भारतातील सर्वात मोठा गँगस्टर, त्याने..”, ‘या’ अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ

On: April 15, 2024 4:27 PM
Salman Khan
---Advertisement---

Salman Khan | बॉलीवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराप्रकरणी एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने कठोर पाऊल उचलायला सुरूवात केली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने जबाबदारी घेतली आहे. याने सलमान खानला धमकीही दिली होती. आता थेट सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकी सुरक्षा व्यवस्था असताना हा गोळीबार झालाच कसा?, असा सवाल आता निर्माण होत आहे.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

या प्रकरणीच आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने सलमान खानवर (Salman Khan ) निशाणा साधला आहे. त्याने ‘हे सगळं नाटक आहे’ असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमल राशिद खान उर्फ केआरके आहे.

केआरके हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो. कलाकार केआरकेकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होत असतं. आता केआरकेने सलमानवर निशाणा साधला असून त्याने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

‘हे सगळं सलमानचं नाटक आहे. सल्लू भारतातील सर्वात मोठा गँगस्टर आहे आणि इतर गँगस्टर त्याच्यासाठी काम करतात. त्यांनी सकाळी 5 वाजता गोळीबार का केला? जेव्हा सगळे झोपलेले असतात. पब्लिसिटी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. कारण त्याला माहिती होतं की मी सुशांत सिंह राजपूतसोबत नेमकं काय झालं याचा खुलासा करणार होतो’, या आशयाची पोस्ट केआरकेने केली आहे.

पुढं केआरकेने अजून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की, सलमान खानचे वडील याला पब्लिसिटी स्टंट बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे. ‘सलीम खान साहेब हे अतिशय इमानदार व्यक्ती आहेत. त्यांनी खरं सांगितलंय की, हा पब्लिसिटी स्टंट आहे’ या आशयाची पोस्ट केआरकेने केली आहे.

दरम्यान, घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानची (Salman Khan ) सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. गोळीबाराच्या वृत्तानंतर सलमान खानचे हितचिंतक त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले आहेत. बाबा सिद्दीकी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याची भेट घेतली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनीही सलमान खानशी फोनवर चर्चा केली.

News Title – KRK sensational post about Salman Khan

महत्त्वाच्या बातम्या-

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार, धैर्यशील मोहिते पाटलांचा ‘या’ दिग्गज नेत्यावर हल्लाबोल

Oops… रोहितच्या एका हातात पँट तर एका हातात बॉल; रोहितसोबत घडली विचित्र घटना

आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडणार

या राशीच्या व्यक्तींना जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल

एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि मॅटर सॉल्व, भिवंडीत नेमकं काय घडलं?

Join WhatsApp Group

Join Now