पाकिस्तान हादरला! ऑपरेशन सिंदूरच्या दहशदीमुळे जैश-ए-मोहम्मदने घेतला मोठा निर्णय

On: June 7, 2025 9:25 AM
Operation Sindoor
---Advertisement---

Operation Sindoor | भारताच्या निर्णायक ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे (Operation Sindoor) पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे बहावलपूर येथील मुख्यालय आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. भारताने मे महिन्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार हे मुख्यालय पुन्हा सुरु करण्याचा कोणताही प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आलेला नाही.

बहावलपूर येथील ‘जामिया सुभान अल्लाह’ हे ठिकाण मशीद म्हणून दाखवले जात होते, मात्र प्रत्यक्षात ते जैश-ए-मोहम्मदचा गड होता. याठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते, भरती केली जात होती आणि भारताविरुद्ध कारवाया आखल्या जात होत्या. आता हे मुख्यालय Google Maps वरदेखील बंद दर्शवले जात आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे.

भारताच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर नाश :

भारताने ६ आणि ७ मे रोजी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील (Pakistan) एकूण ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख केंद्र असलेले बहावलपूरमधील मुख्यालय पूर्णपणे नष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर ही मोठी कारवाई झाली होती, ज्यात २६ पर्यटकांचा बळी गेला होता.

या कारवाईत जैश प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला, तसेच त्याचे चार प्रमुख सहकारीही ठार झाले. हल्ल्यानंतर मिळालेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये संपूर्ण ठिकाण ढिगाऱ्यांत बदलले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून या जागी कोणतीही हालचाल किंवा पुन्हा सुरुवात होत असल्याचे आढळले नाही.

Operation Sindoor | पाकिस्तानची शांतता मागणी आणि भारताची आक्रमक भूमिका :

भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने शांततेची मागणी केली असून भारताकडून पुढील टप्प्याची तयारी सुरूच असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ऑपरेशन सिंदूर संपलेले नसल्याचे स्पष्ट केल्याने पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भारताची ही ठाम आणि निर्णायक भूमिका संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरली आहे.

भारताची ही कारवाई केवळ लष्करी नव्हे तर रणनीतिक पातळीवर देखील प्रभावी ठरली आहे. जैश-ए-मोहम्मदसारख्या (Jaish-e-Mohammed) संघटनांचा पायाभूत नाश करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे. यामुळे सीमावर्ती भागात असलेल्या अन्य दहशतवादी गटांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

News Title: India’s Operation Sindoor Forces Jaish-e-Mohammed Headquarters in Bahawalpur to Shut Down Permanently

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now