रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! जनरल तिकीट नियमांमध्ये मोठे बदल होणार?

On: March 6, 2025 10:32 AM
Indian Railways Ticket Rules
---Advertisement---

Indian Railways Ticket Rules l भारतीय रेल्वे (Indian Railways) जनरल तिकीट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमांमुळे कोट्यवधी प्रवाशांवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्यासाठी ही सुधारणा करण्यात येत आहे. विशेषतः, अनारक्षित डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे.

जनरल तिकीटाच्या नियमांमध्ये काय बदल होणार? :

सध्या प्रवासी रेल्वे स्टेशनवर जाऊन जनरल तिकीट काढून कोणत्याही अनारक्षित डब्यातून प्रवास करू शकतात. मात्र, येत्या काळात रेल्वे प्रशासन या प्रक्रियेत बदल करण्याच्या विचारात आहे. नवीन नियमांनुसार जनरल तिकीटावर प्रवास करायच्या गाडीचे नाव नमूद केले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना फक्त त्याच गाडीत प्रवास करावा लागेल.

याशिवाय, तिकीटाची कालमर्यादा (Validity) सध्या तीन तासांची असते. म्हणजेच तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू केला नाही, तर ते तिकीट बाद होईल. भविष्यात हा कालावधी कमी किंवा बदलण्याची शक्यता आहे.

Indian Railways Ticket Rules l दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर बदलाचा निर्णय :

काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीमध्ये अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट प्रणाली सुधारण्याचा निर्णय घेतला.

सध्या जनरल तिकीट असलेला प्रवासी सहजपणे गाडी बदलू शकतो. मात्र, नव्या नियमानुसार प्रवाशांना फक्त त्यांच्या तिकीटावर नमूद केलेल्या गाडीतूनच प्रवास करावा लागेल. यामुळे अनावश्यक गर्दी आणि गोंधळ टाळण्यास मदत होईल.

नव्या नियमांचा प्रवाशांवर परिणाम :

या नियमानुसार प्रवाशांना प्रवासाच्या आधी योग्य गाडी निवडावी लागेल आणि वेळेचे नियोजन करावे लागेल. अचानक गाडी बदलणे शक्य होणार नाही, त्यामुळे प्रवाशांना अधिक काळजीपूर्वक तिकीट काढावे लागेल.

रेल्वे प्रशासन लवकरच या बदलांविषयी अधिकृत घोषणा करणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी भविष्यातील प्रवासाचे नियोजन हे संभाव्य नव्या नियमांनुसार करावे लागेल.

News title : Indian Railways to Modify General Ticket Rules

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now