भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी आंनदाची बातमी, आता ट्रेनमध्येच मिळणार पैसे!

On: April 16, 2025 2:56 PM
ATM
---Advertisement---

Indian Railway | रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. अनेकदा प्रवासादरम्यान रोख रक्कम कमी पडल्यास अडचण निर्माण होते. यावर तोडगा म्हणून आता भारतीय रेल्वेने ट्रेनमध्येच एटीएम बसवण्याचा प्रयोग सुरु केला आहे.

पंचवटी एक्सप्रेसमध्ये लावलं पहिलं एटीएम

भारतीय रेल्वेने सध्या एका खास उपक्रमांतर्गत एटीएम सुविधा सुरू करण्याची चाचणी हाती घेतली आहे. मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एक एटीएम मशीन बसवण्यात आलं आहे. या प्रयोगातून प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्येही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

ज्या प्रवाशांना ऑनलाईन व्यवहारांपेक्षा रोख रक्कमेवर अधिक अवलंबून राहावं लागतं, त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा अचानक रोख पैसे संपतात आणि एटीएम शोधणं शक्य नसतं, त्यावेळी हा पर्याय मदतीचा ठरेल.

चाचणी यशस्वी झाल्यास इतर ट्रेन्समध्येही सुविधा

रेल्वे प्रशासन सध्या या सुविधेची कार्यक्षमता, नेटवर्क कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अधिकारी तपास करत आहेत की, एटीएम धावत्या गाडीत नीट कार्यरत राहतो की नाही. चाचणी यशस्वी झाल्यास ही सुविधा अन्य ट्रेन्समध्येही सुरू करण्यात येणार आहे.

या सुविधेमुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर उतरण्याची किंवा एटीएम शोधण्याची गरज भासणार नाही. या उपक्रमामुळे प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होईल.

पंचवटी एक्सप्रेसची निवड का झाली?

पंचवटी एक्सप्रेस ही दररोज मुंबई ते नाशिकदरम्यान धावणारी लोकप्रिय इंटरसिटी ट्रेन आहे. सुमारे ४ तास ३५ मिनिटांचा एकाच बाजूचा प्रवास असतो आणि यात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची मोठी संख्या आणि ट्रेनची लोकप्रियता लक्षात घेता हा नवा उपक्रम याच ट्रेनमध्ये राबवण्यात आला आहे.

 Title: Indian Railway ATM Now Inside Running Trains

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now