Indian Army NCC Recruitment | भारतीय सैन्याने (Indian Army) एनसीसी विशेष प्रवेश योजना – ऑक्टोबर 2025 अंतर्गत भरतीची घोषणा केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट http://joinindianarmy.nic.in वर सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि रिक्त जागांची माहिती तपशीलवार वाचणे आवश्यक आहे. ही भरती एनसीसी विशेष प्रवेश योजना (ऑक्टोबर 2025 – 58 वा कोर्स) अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी आहे. रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
रिक्त जागांचा तपशील
एकूण जागा:
एनसीसी विशेष प्रवेश (पुरुष) – 70
एनसीसी विशेष प्रवेश (महिला) – 06
शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक अटी
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.
अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्या आधीच्या वर्षांमध्ये किमान 50% गुण असणे गरजेचे आहे.
उमेदवाराने एनसीसीमध्ये कमीतकमी दोन वर्षे सेवा केलेली असावी आणि त्यांच्याकडे वैध एनसीसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा/अर्ज प्रक्रिया आणि शुल्क
उमेदवाराचे वय 1 जुलै 2025 रोजी 19 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. (Indian Army NCC Recruitment)
नोकरीचे ठिकाण/ अर्ज करण्याची अंतिम तारीख
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतातील विविध सैन्य ठिकाणी केली जाईल.
उमेदवारांनी 15 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा
http://joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
“Officer Entry Application/Login” वर क्लिक करून नवीन नोंदणी करा.
“Online Application” वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा. (Indian Army NCC Recruitment)
Title : Indian Army NCC Recruitment October 2025






