Cargo Ship l केंद्र सरकारने शाश्वत आणि हरित ऊर्जा साधनांद्वारे देशाला सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अंतर्गत, देशातील पहिले बॅटरीवर चालणारे मालवाहू जहाज लवकरच तयार होणार आहे. तब्बल 3000 टन क्षमतेच्या या जहाजाची बांधणी लवकरच सुरू होणार आहे.
बॅटरीवर चालणारे जहाज :
मुंबई बंदरात (Mumbai Port) कार्यरत असलेल्या ‘एसएसआर मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ (SSR Marine Services Pvt Ltd) कंपनीने या जहाजाची घोषणा केली. केंद्रीय जहाज बांधणी व बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांच्या उपस्थितीत मुंबईत (Mumbai) झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ही घोषणा करण्यात आली. हे डिझेल-इलेक्ट्रिक (Diesel-Electric) प्रकारचे जहाज असेल. डिझेलच्या आधारे वीज तयार करून ती बॅटरीमध्ये साठवली जाईल आणि त्याच बॅटरीच्या आधारे जहाज पुढे मार्गक्रमण करील.
Cargo Ship l भारतातील पहिले पाऊल :
सध्या, अशा प्रकारचे तंत्रज्ञान भारतात फक्त पाणबुड्यांमध्ये (Submarines) वापरले जाते. ते प्रथमच मालवाहू जहाजांमध्ये वापरले जाणार आहे.
जहाजाची वैशिष्ट्ये :
एरवी 100 टक्के डिझेलवर (Diesel) चालणारे मालवाहू जहाज बॅटरीवर चालणार असल्याने, डिझेल व इलेक्ट्रिक, अशी दोन्ही इंधन किंवा ऊर्जा साधने जहाज चालविण्यासाठी उपलब्ध असतील. यामुळे 90 टक्के इंधनाची बचत होऊन तितके कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) कमी होईल. 2047 च्या विकसित भारताच्या दृष्टीने हे समुद्री क्षेत्रातील पहिले मोठे पाऊल आहे, असे ‘एसएसआर मरिन’चे संजीव अग्रवाल यांनी या परिषदेत स्पष्ट केले.






