‘ना बंदूक, ना बारूद!’ भारताने पहलगामचा घेतला ‘असा’ बदला, पाकिस्तानला आता पाण्यासाठीही रडावं लागणार

On: April 24, 2025 8:21 AM
India Strikes Back of Pahalgam Attack
---Advertisement---

Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात ठोस आणि कठोर पावलं उचलली आहेत. 28 निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा प्रतिशोध भारताने गोळी न चालवता घेतला असून पाकिस्तानला चारही बाजूंनी कोंडीत पकडलं आहे. (Pahalgam Attack )

सिंधू पाणी करार रद्द 

पाकिस्तानसाठी जीवनरेषा ठरलेल्या सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांवरील सिंधू पाणी करार भारताने थांबवण्याचा निर्णय घेतला. या कराराअंतर्गत भारत गेली सहा दशके पाकिस्तानला त्याच्या वाट्याचं पाणी देत होता. आता हे पाणी रोखल्यास पाकिस्तानमधील 80 टक्के शेती अडचणीत येईल. जलविद्युत प्रकल्प आणि पाण्याच्या टंचाईमुळे वीज संकटही गडद होईल. या निर्णयामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि जनजीवन कोलमडू शकते.

अटारी पोस्ट बंद 

भारत आणि पाकिस्तानमधील उरलेसुरले व्यापार व्यवहार अटारी बॉर्डर पोस्टवरून चालू होते. आता ही पोस्ट बंद केल्यामुळे लहान व्यापाऱ्यांनाही झटका बसणार आहे. पाकिस्तानचा सीमावर्ती व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा हा निर्णय पाकिस्तानच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम करेल.

व्हिसा बंदी आणि व पाक नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश

SAARC व्हिसा स्कीम रद्द करून भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतात येण्याचा मार्ग पूर्णतः बंद केला आहे. कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील मानवी संवादाचा शेवट झाला आहे.

याचबरोबर नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात नियुक्त असलेले लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे सल्लागार यांना सात दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भारतानेही इस्लामाबादमधून आपल्या लष्करी सल्लागारांना परत बोलावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक आणि लष्करी संवाद पूर्णतः थांबला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) बैठकीनंतर हे पाच निर्णय जाहीर झाले. यामुळे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे – आता फक्त निषेध नव्हे, तर प्रत्यक्ष कारवाई. व्हिसा नाही, व्यापार नाही, चर्चा नाही – भारत पाकिस्तानला सर्व पातळीवर एकाकी टाकण्याच्या दिशेने चालत आहे.

Title : India Strikes Back of Pahalgam Attack

 

 

Join WhatsApp Group

Join Now