टीम इंडिया मालामाल! वर्ल्ड कप जिंकताच भारतावर ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; न्यूझीलंडला किती रुपये मिळाले?

On: March 9, 2026 1:15 PM
T20 World Cup 2026 Prize Money
---Advertisement---

T20 World Cup 2026 Prize Money | आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघावर बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव झाला आहे. न्यूझीलंडला अंतिम सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत करत भारताने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकला. या ऐतिहासिक यशानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात पारितोषिक रक्कम जाहीर करण्यात आली.

भारताचा ऐतिहासिक विजय आणि कोट्यवधींचे बक्षीस :

आयसीसी मेन्स टी-२० विश्वचषक 2026 (ICC Men’s T20 World Cup 2026) च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड (New Zealand) संघाचा 96 धावांनी पराभव करत इतिहास घडवला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात भारताला यश आले असून प्रथमच घरच्या मैदानावर भारतीय संघ विश्वविजेता ठरला.

या स्पर्धेत मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात आर्थिक बक्षीसही मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) अर्थात आयसीसीने या स्पर्धेसाठी एकूण 13.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 120 कोटी रुपयांचा प्राईज पूल जाहीर केला होता. हा निधी मागील आवृत्तीपेक्षा सुमारे 20 टक्क्यांनी अधिक होता. विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाला 3 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 27.5 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (Board of Control for Cricket in India) जमा होणार असून त्यानंतर ती खेळाडूंमध्ये बोनस, सामन्याचे मानधन आणि इतर पुरस्कारांच्या स्वरूपात वाटली जाणार आहे.

T20 World Cup 2026 Prize Money | इतर संघांनाही मोठी पारितोषिके :

अंतिम सामना गमावला असला तरी न्यूझीलंडच्या संघालाही मोठी आर्थिक रक्कम देण्यात आली. उपविजेते म्हणून त्यांना 1.6 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 14.7 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचणाऱ्या दोन्ही संघांना भरघोस आर्थिक लाभ झाला आहे.

याशिवाय स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या इंग्लंड (England) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) या संघांनाही मोठे बक्षीस देण्यात आले. या दोन्ही संघांना सुमारे 7.24 कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम मिळाली. सुपर-८ टप्प्यात पोहोचलेल्या झिम्बाब्वे (Zimbabwe), पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका (Sri Lanka) आणि वेस्ट इंडिज (West Indies) या संघांनाही प्रत्येकी अंदाजे 3.48 कोटी रुपये देण्यात आले. गट फेरीतून पुढे जाऊ न शकलेल्या अफगाणिस्तान (Afghanistan), ऑस्ट्रेलिया (Australia), कॅनडा (Canada), आयर्लंड (Ireland), इटली (Italy), नामिबिया (Namibia), नेपाळ (Nepal), नेदरलँड्स (Netherlands), ओमान (Oman), स्कॉटलंड (Scotland), युएई (United Arab Emirates) आणि युनायटेड स्टेट्स (United States) या संघांनाही प्रोत्साहनपर रक्कम म्हणून सुमारे 2.3 कोटी रुपये देण्यात आले.

दरम्यान, संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताब देण्यात आला. अंतिम सामन्यात त्याने 46 चेंडूत 89 धावा करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

News Title: India Earns Huge T20 Prize

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now