कुठे आणि कधी पडणार पाऊस?, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

On: January 28, 2025 5:08 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Weather Update l राज्यासह संपूर्ण देशात (India) गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका (Cold Wave) चांगलाच वाढला होता. मात्र, आता पुन्हा एकदा वातावरणात (Climate) मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली असून, थंडी कमी झाली आहे. असे असले तरी, हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा दिला आहे.

कुठे आणि कधी पडणार पाऊस? :

आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा (Alert) देण्यात आला आहे.

पर्वतीय राज्यांमध्ये हिमवृष्टीची शक्यता :

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टीची (Snowfall) देखील शक्यता आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यापैकी हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होणार असल्याने, पर्यटकांसाठी (Tourists) हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Weather Update l उत्तर भारतातही पावसाचा अंदाज :

हवामान विभागाने उत्तर भारतातही (North India) पावसाचा इशारा दिला आहे. पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), चंडीगड (Chandigarh), दिल्ली एनसीआर (Delhi NCR) आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अनेक ठिकाणी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह (Thunderstorm) आणि विजांच्या कडकडाटासह (Lightning) पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशावर तिहेरी संकट :

एकूणच, हवामान विभागाकडून देशाच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, काही भागांमध्ये बर्फवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता विजा, पाऊस आणि बर्फवृष्टी असे तिहेरी संकट देशावर असणार आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती? :

महाराष्ट्राबाबत (Maharashtra) बोलायचे झाल्यास, राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, हवेत गारठा (Cold) कायम राहणार आहे.

News Title: IMD-Issues-Rain-and-Snowfall-Alert-for-Several-States-Cold-Wave-Continues-in-Maharashtra

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now