‘…तर मी लगेच राजीनामा देईन’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

On: January 29, 2025 4:56 PM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असून, या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विरोधकांसोबतच अजित पवार गटातील काही नेतेही त्यांच्यावर दबाव टाकत असल्याने पक्षातही मतभेद निर्माण झाले आहेत.

धनंजय मुंडे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी स्वपक्षीय आमदारांसोबत बैठक घेतली आणि आपल्या राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट केली.

“अजित पवार आदेश देतील, तर लगेच राजीनामा देईन” :

या बैठकीत धनंजय मुंडे यांनी पक्षातील काही आमदारांवर शंका उपस्थित केली आणि काही जण वैयक्तिक कारणांमुळे राजीनाम्याची मागणी करत असल्याचा आरोप केला.

धनंजय मुंडे म्हणाले, “जर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माझा राजीनामा मागितला, तर मी लगेचच तो देईन. मात्र सध्या सुरू असलेल्या गोंधळात काही वेगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत.”

Dhananjay Munde l पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड? :

धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावरून अजित पवार गटातच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही आमदार त्यांच्यावर थेट नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे त्यांना अजूनही अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांचे पाठबळ आहे.

राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता :

राजकीय जाणकारांच्या मते, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, तर सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांकडून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

आता अजित पवार आणि महायुती सरकार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

News Title : If Ajit Pawar orders, I will resign immediately, Dhananjay munde statement

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now