Hyderabad Murder | हैदराबादमध्ये (Hyderabad) एक खळबळजनक घटना घडली आहे. वेलजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या (Veljan Group of Industries) अध्यक्षाची त्यांच्याच नातवाने संपत्तीच्या वादातून (Property Dispute) हत्या केली. बचावासाठी मध्ये आलेल्या आईवरही आरोपीने चाकूने हल्ला केला. (Hyderabad Murder)
संपत्तीच्या वादामुळे घडली हत्येची घटना
व्ही.सी. जनार्दन राव यांच्यावर हल्ला करणारा आरोपी किर्ती तेजा, अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून घरी परतला होता. त्याचा आपल्या आजोबांशी संपत्तीवरून वाद सुरू होता.
गुरुवारी, तेजा त्याच्या आईसोबत आजोबांच्या घरात गेला. त्याची आई किचनमध्ये कॉफी बनवायला गेली, त्यानंतर तेजा आणि राव यांच्यात संपत्तीच्या मुद्द्यावर वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, तेजाने चाकूने 70 हून अधिक वार केले आणि त्यांचा खून केला.
घटनेनंतर पोलिसांकडून तातडीने कारवाई
वादाच्या दरम्यान, तेजाची आई सासऱ्याचा बचाव करण्यासाठी हस्तक्षेप करत असताना, आरोपीने तिच्यावर देखील चाकूने हल्ला केला. त्यामुळे ती गंभीरपणे जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी किर्ती तेजाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (Hyderabad Murder)
तेजाचा आरोप आहे की त्याचे आजोबा लहानपणापासून चांगले वागत नव्हते आणि संपत्तीची योग्य वाटणी करत नव्हते, यामुळे त्याने त्यांचा खून केला.
Title : Hyderabad Murder Grandson Kills Grandfather Over Property Dispute






