वाहनधारकांनो लक्ष द्या! HSRP नंबर प्लेट संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर

On: March 23, 2026 1:27 PM
HSRP Number Plate Rule
---Advertisement---

HSRP Number Plate Rule | राज्यात वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले असतानाही अनेक वाहनधारकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अंतिम मुदत संपल्यानंतरही शासनाने काही काळ अतिरिक्त सवलत दिली होती. मात्र आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नियम लागू; अनेक वाहनधारक अजूनही बाकी :

वाहनांची ओळख सुरक्षित आणि प्रमाणित ठेवण्यासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (High Security Registration Plate) लागू करण्यात आली आहे. या नंबरप्लेटमध्ये विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असल्यामुळे बनावट नंबरप्लेट तयार करणे किंवा चोरीच्या वाहनांची ओळख लपवणे कठीण होते. त्यामुळेच शासनाने सर्व वाहनांसाठी हा नियम बंधनकारक केला आहे.

राज्यात हा नियम लागू करूनही अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. 2 मार्चपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सुमारे 50 टक्के वाहनांवरच एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. जवळपास 1 कोटी 2 लाख वाहनधारकांनी नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात फक्त 88 लाख वाहनांवर प्लेट बसवण्यात आली आहे. याचा अर्थ लाखो वाहनधारकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

HSRP Number Plate Rule | नंबरप्लेट नसल्यास थेट दंड:

परिवहन विभाग (Transport Department) यांनी या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी फेब्रुवारीपासूनच तपासणी मोहिमा सुरू केल्या आहेत. अंतिम मुदत संपल्यानंतरही अतिरिक्त वेळ दिला गेला होता, मात्र तरीही नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर आता थेट कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी सुरू असून नियमभंग करणाऱ्यांवर दंड आकारला जात आहे. (HSRP Number Plate Rule)

जर वाहनावर एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नसल्याचे आढळले, तर वाहनधारकांना 1,000 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर लवकरात लवकर नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे.

ज्या वाहनधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर वाहनाचा नंबर आणि चेसीस नंबर टाकून नंबरप्लेटची ऑर्डर देता येते. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर जवळच्या अधिकृत केंद्रात वेळ निश्चित करून नंबरप्लेट बसवून घेता येते. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नियमांचे पालन न केल्यास कारवाई आणखी कठोर होऊ शकते, त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

News title : HSRP Plate Fine Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now