Sukanya Samriddhi Yojana | मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि हमीदार गुंतवणूक पर्याय शोधत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सर्वोत्तम सरकारी पर्याय मानला जातो. केंद्र सरकारने मुलींसाठी सुरू केलेल्या या योजनेत व्याजदरावर कोणताही धोका नसतो आणि मॅच्योरिटीवेळी मिळणारी रक्कम संपूर्ण करमुक्त (Tax-Free) असते. 2025 सालासाठी या योजनेचा व्याजदर वार्षिक 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे. (Sukanya Samriddhi Yojana)
या योजनेत पालक किंवा पालक प्रतिनिधी आपल्या मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. हे खाते मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षे वयापर्यंत उघडता येते. दरवर्षी जास्तीत जास्त ₹1.50 लाख या खात्यात जमा करता येतात. त्यामुळे अनेक पालक या योजनेत गुंतवणूक करून भविष्यातील शिक्षण, करिअर किंवा विवाहासाठी निधी तयार करत आहेत. (SSY Interest Rate 2025)
वार्षिक ₹1.50 लाखांनी किती रक्कम तयार होईल? :
समजा, तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून सलग 15 वर्षे सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी ₹1,50,000 जमा केले, तर एकूण जमा रक्कम होते ₹22,50,000 रुपये. मात्र, या योजनेचे आकर्षण जमा रक्कम नव्हे तर 8.2% चक्रवाढ व्याजामुळे मिळणारा मोठा परतावा आहे. (Sukanya Samriddhi Yojana)
15 वर्षांनंतर खाते बंद होत नाही, तर पुढील 6 वर्षे फक्त व्याज वाढत राहते. जमा बंद झाल्यानंतरही व्याज मिळत असल्यामुळे अंतिम मॅच्योरिटी रक्कम मोठी होते. गणितानुसार:
– एकूण ठेव रक्कम: ₹22,50,000
– एकूण व्याज (8.2% कंपाउंडिंग): ₹49,32,119
– मॅच्योरिटी रक्कम: ₹71,82,119 (अंदाजे)
म्हणजेच, फक्त 22.5 लाखांची गुंतवणूक तुम्हाला 21 वर्षांनी सुमारे 72 लाखांचे फायनान्सियल रिझल्ट देऊ शकते.
Sukanya Samriddhi Yojana | कर लाभ आणि इतर फायदे :
सुकन्या समृद्धी योजना ही EEE (Exempt-Exempt-Exempt) श्रेणीतील गुंतवणूक योजना आहे. म्हणजेच:
– जमा रक्कम 80C अंतर्गत करमुक्त
– व्याज करमुक्त
– अंतिम मॅच्योरिटी रक्कमही संपूर्ण करमुक्त
याशिवाय सरकारची हमी, कोणताही बाजारभावाचा धोका नसणे आणि सुरक्षित व्याजदर यामुळे ही योजना पालकांसाठी सर्वाधिक पसंतीची ठरते. या योजनेत किमान ₹250 देखील जमा करता येतात, ज्यामुळे सर्व स्तरातील कुटुंबांना गुंतवणुकीची संधी मिळते. (Sukanya Samriddhi Yojana)
देशभरात या योजनेत आजवर 4 कोटींपेक्षा जास्त खाती उघडलेली आहेत आणि जमा रक्कम ₹3.25 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यावरून पालकांचा विश्वास आणि या योजनेची लोकप्रियता सहज लक्षात येते. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी सुरक्षित निधी हवा असल्यास SSY एक उत्तम पर्याय आहे.






