Gold Import Rules l दुबईहून भारतात परतताना अनेक प्रवासी सोन्याची खरेदी करून आणतात, मात्र यासाठी केंद्र सरकारने ठरवलेले नियम आहेत. CBIC (Central Board of Indirect Taxes and Customs) ने सोनं आणण्याच्या बाबतीत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये कस्टम फ्री लिमिटपासून ते शुल्क लागू होणाऱ्या अटींपर्यंत सर्व तपशील दिले आहेत. (Gold from Dubai to India)
दुबईमध्ये सोनं स्वस्त असून त्याची गुणवत्ता (Gold from Dubai to India) उत्तम असते, त्यामुळे प्रवाशांमध्ये त्याला प्रचंड मागणी असते. मात्र, सोनं आणताना कागदपत्रं, वजन, स्वरूप आणि राहण्याचा कालावधी महत्त्वाचा ठरतो.
पुरुष-स्त्रियांना वेगवेगळ्या मर्यादा :
CBIC च्या नियमानुसार, पुरुष प्रवाशांना 20 ग्रॅम आणि महिला प्रवाशांना 40 ग्रॅमपर्यंतचं सोनं शुल्काशिवाय भारतात आणता येतं. हे सोनं कॉईन, बार किंवा आभूषणाच्या स्वरूपात असू शकतं. मात्र, या मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणायचं असेल, तर कस्टम शुल्क भरावं लागतं.
15 वर्षांखालील बालकांनाही 40 ग्रॅमपर्यंत सोनं आणण्याची मुभा आहे, पण पालकत्वाचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे. प्रवाशांनी या मर्यादेच्या आधारेच खरेदी आणि प्रवास नियोजन करावं. (Gold from Dubai to India)
Gold Import Rules l 1 किलोपर्यंत सोनं आणता येतं, पण शुल्क भरावं लागतं :
जर कोणी प्रवासी दुबईमध्ये 6 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी राहिला असेल, तर तो कमाल 1 किलोपर्यंत सोनं भारतात आणू शकतो. मात्र, यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागते आणि प्रवाशाने ‘रेड चॅनेल’ मार्गाचा वापर करावा लागतो. यासाठी खरेदीचे बिल, ओळखपत्र आणि सोन्याचे पॅकेजिंग तपशील आवश्यक आहेत.
कस्टम शुल्काची रचना खालीलप्रमाणे:
पुरुष प्रवासी:
20–50 ग्रॅम: 3% ड्युटी
50–100 ग्रॅम: 6% ड्युटी
100 ग्रॅमहून अधिक: 10% ड्युटी
महिला प्रवासी:
40–100 ग्रॅम: 3% ड्युटी
100–200 ग्रॅम: 6% ड्युटी
200 ग्रॅमपेक्षा अधिक: 10% ड्युटी
कागदपत्रे आवश्यक, नियमभंग केल्यास दंड :
सोनं आणताना संबंधित सर्व कागदपत्रं बरोबर ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यामध्ये खरेदीचं बिल, वस्तूचं वर्णन, ओळखपत्र, आणि प्रवासाची वैध माहिती यांचा समावेश होतो. नियमांचं उल्लंघन केल्यास कस्टम विभाग कारवाई करू शकतो, जसे की सोन्याची जप्ती किंवा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो.
त्यामुळे दुबईहून सोनं आणणाऱ्या प्रवाशांनी नियमपूर्वक आणि माहितीपूर्ण पद्धतीने योजना आखावी, शक्य असल्यास शुल्कमुक्त मर्यादेतच खरेदी करावी.






