हेरगिरी केल्याच्या बदल्यात ज्योती मल्होत्राला पाकिस्तानकडून किती पैसे मिळाले? चौकशीतून माहिती समोर

On: May 19, 2025 5:10 PM
Jyoti Malhotra
---Advertisement---

Jyoti Malhotra | पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर सध्या चौकशी सुरू असून, दररोज नवनवीन धक्कादायक माहिती उघड होत आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या आणि ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनेलमुळे प्रसिद्ध झालेल्या ज्योतीने पाकिस्तानातील गुप्तचर संस्थांसोबत थेट संपर्कात राहून भारतातील संवेदनशील माहिती पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुरुवातीला केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख असलेल्या ज्योतीचा पाकिस्तानशी असलेला संबंध आणि तिने त्यांच्यासाठी केलेली हेरगिरी या प्रकरणाला आता गंभीर वळण देत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये तिची केवळ भूमिका नव्हे, तर तिला याबद्दल कोणते आर्थिक लाभ मिळाले, याकडेही तपास अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. (Jyoti Malhotra)

सोशल मीडियावर कमाई, पण हेरगिरीतून मिळाले ‘हवालाचे’ पैसे? :

ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणातील हिसारची असून, ती तिच्या यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम अकाउंटवर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रवास केलेले व्हिडीओ पोस्ट करत होती. ‘ट्रॅव्हल विथ जो’ या चॅनेलवर तिचे लाखो सबस्क्रायबर्स असून, ती दरमहा सुमारे 1.5 लाख रुपये कमावत असल्याची माहिती आहे. मात्र, तिची ही कमाई केवळ सोशल मीडिया मर्यादित नव्हती, असं चौकशीतून समोर आलं आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने पाकिस्तानी एजंटांकडून हवालाच्या माध्यमातून पैसे घेतले होते. हे पैसे कोणत्या मार्गांनी आणि किती प्रमाणात मिळाले, याबाबत अजून नेमकी रक्कम समोर आलेली नाही. मात्र, हेरगिरीच्या बदल्यात तिला मोठा आर्थिक लाभ मिळत होता, हे स्पष्ट झालं आहे.

Jyoti Malhotra | पाक एजंटांशी थेट संपर्क, खोट्या नावाने नंबर सेव्ह :

ज्योती पाकिस्तानात अली अहवा, शाकीर आणि राणा शहाबाज या व्यक्तींना भेटली होती. तिने शाकीरचा मोबाईल नंबर ‘जट्ट रंधावा’ या खोट्या नावाने सेव्ह केला होता. ही माहिती तिच्या मोबाईलमधून मिळाल्यानंतर चौकशी अधिक खोलात सुरू झाली आहे. शाकीरसोबत ती व्हॉट्सॲप, टेलीग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून सतत संवाद साधत होती.

याशिवाय, हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्रासोबत इतरही काही व्यक्ती अटकेत आहेत. गजाला, यामीन मोहम्मद दानीश, देविंदर सिंह ढिल्लो, अरमान यांचा यात समावेश असून, हे सर्वजण पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होते, असे स्पष्ट झाले आहे. (Jyoti Malhotra)

या सर्व पार्श्वभूमीवर, ज्योतीला हेरगिरीच्या बदल्यात नेमके किती पैसे मिळाले? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या तरी अधिकृत आकडा समोर आलेला नसला, तरी पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहेत.

News Title: How Much Did Pakistan Pay Jyoti Malhotra for Espionage? Shocking Details Emerge

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now