डॉक्टरचं भयानक कांड; 4 महिने घरात ठेवले दोन मृतदेह; दुर्गंधी लपवण्यासाठी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

On: January 31, 2025 3:42 PM
Homeopathic Doctor Kills Girlfriend Keeps 2 Dead Bodies In Flat For 4 Months Chennai Murder
---Advertisement---

Chennai Murder | एका होमिओपॅथिक डॉक्टरने (Homeopathic Doctor) त्याच्या 37 वर्षीय प्रेयसीची (Girlfriend) हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सॅम्युअल एबेनेजर संपत (Samuel Ebenezer Sampath) (34 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. त्याने 37 वर्षांची प्रेमिका सिंथियाची (Cynthia) हत्या केली. सिंथियाचे वडील सॅम्युअल शंकर (Samuel Shankar) यांच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये वाद झाला होता. सिंथियाने तिच्या वडिलांच्या मृत्यूसाठी संपतला जबाबदार धरले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. या दरम्यान संपतने सिंथियाला धक्का दिला. त्यानंतर ती बेशुद्ध (Unconscious) पडली आणि मग तिचा मृत्यू झाला. (Chennai Murder)

संपतने सिंथिया आणि तिच्या वडिलांचा मृतदेह चार महिने स्वतःच्या घरात ठेवला. मृतदेहांची दुर्गंधी (Stench) लपवण्यासाठी त्याने काही रसायनांचा (Chemicals) वापर केला. फ्लॅटमधील एसी (AC) सुरू करून तो कांचीपुरमला (Kanchipuram) त्याच्या नातेवाईकांकडे गेला. या दरम्यान 4 महिने त्याची प्रेयसी आणि तिच्या वडिलांचा मृतदेह फ्लॅटमध्येच पडून होते. गुरुवारी (30 जानेवारी) मृतदेहांमधून तीव्र दुर्गंधी पसरली. त्यामुळे शेजाऱ्यांना (Neighbors) त्रास होऊ लागला. त्यांनी याची माहिती पोलिसांना (Police) दिली. पोलिसांनी घटनास्थळी (Crime Scene) पोहोचून घराचे दार उघडले. त्यावेळी त्यांना 2 मृतदेह सापडले. ते सडू लागले होते. पोलिसांनी आरोपी सॅम्युअल एबेनेजर संपतला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आधी झाली सोशल मीडियावर ओळख

सॅम्युअल एबेनेजर हा ऑस्ट्रियाचा (Austria) रहिवासी आहे. तो सप्टेंबर 2024 पासून सिंथिया आणि तिच्या वडिलांसोबत चेन्नईच्या (Chennai) थिरुमुल्लाइवॉयलमध्ये (Thirumullaivoyal) एका इमारतीत राहत होता. सिंथिया आणि संपतची भेट सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून झाली होती. सिंथिया तिच्या वडिलांच्या उपचारासाठी (Treatment) चेन्नईमध्ये वास्तव्यास होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर झाला वाद

किडनी (Kidney) निकामी (Failure) झाल्याने काही महिन्यांपूर्वी सॅम्युअल शंकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी सिंथियाने संपतला जबाबदार धरले. त्यावेळी संपत परदेशी जाण्याची योजना आखत होता. पण सिंथियाने संपतला परदेशी जाऊ दिले नाही. त्यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. भांडण सुरू असताना संपतने सिंथियाला धक्का दिला. ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली. काही वेळाने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Chennai Murder)

या घटनेमुळे चेन्नई हादरून गेले असून, एका क्षुल्लक वादातून घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Title : Homeopathic Doctor Kills Girlfriend Keeps 2 Dead Bodies In Flat For 4 Months Chennai Murder

 

Join WhatsApp Group

Join Now