पालकांनो सावध व्हा! जड दप्तरामुळे मुलांनो होतोय ‘हा’ गंभीर आजार

On: July 17, 2026 8:23 PM
Health Tips
---Advertisement---

Health Tips | शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते वजन हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुस्तके, वह्या, डबा, पाण्याची बाटली आणि इतर साहित्यामुळे दप्तर जड होत असून त्याचा थेट परिणाम मुलांच्या मणक्यावर आणि शरीराच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी दप्तराचे वजन आणि ते वापरण्याची योग्य पद्धत याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

जड दप्तरामुळे कोणते धोके निर्माण होतात? :

लहान मुलांची हाडे, स्नायू आणि सांधे विकसित होत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडल्यास विविध शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. जड दप्तर वाहून नेताना शरीराचा समतोल राखण्यासाठी मुलांना पुढे झुकावे लागते. यामुळे मान, खांदे आणि कंबर या भागांवर अनावश्यक दबाव निर्माण होतो. हा ताण सातत्याने राहिल्यास स्नायू दुखणे, शरीराची ठेवण बिघडणे, पाठदुखी तसेच मणक्याशी संबंधित दीर्घकालीन त्रास उद्भवू शकतो. अशा समस्या मुलांच्या दैनंदिन हालचालींसह त्यांच्या शारीरिक विकासावरही परिणाम करू शकतात.

शाळेतून परतल्यानंतर पाठ, मान किंवा खांदे वारंवार दुखणे, दप्तराच्या पट्ट्यांमुळे खांद्यांवर लाल व्रण दिसणे, सरळ उभे राहण्यात अडचण येणे किंवा दप्तर खूप जड असल्याची तक्रार करणे ही गंभीर लक्षणे समजली जातात. काही मुलांमध्ये लवकर थकवा येणे, डोकेदुखी होणे तसेच खांद्यावर सतत दाब पडल्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

Health Tips | तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला :

बाल अस्थिरोगतज्ज्ञ यांनी सांगितले की, शालेय दप्तराचे वजन मुलाच्या एकूण वजनाच्या 10 ते 15 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. दप्तर निवडताना ते हलके, पाठीला योग्य आधार देणारे आणि रुंद, मऊ गादी असलेल्या खांद्याच्या पट्ट्यांचे असावे. मुलांनी दप्तर नेहमी दोन्ही खांद्यांवर समान पद्धतीने वाहावे. एका खांद्यावर दप्तर टांगून नेण्याची सवय टाळावी. तसेच त्या दिवशी आवश्यक असलेली पुस्तके आणि वह्याच दप्तरात ठेवावीत. शाळेत लॉकरची सुविधा असल्यास त्याचाही वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याशिवाय नियमित स्ट्रेचिंग आणि वयानुसार योग्य व्यायाम केल्यास पाठ व पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि शरीराची योग्य ठेवण राखण्यास मदत होते. दप्तराचे वजन कमी केल्यानंतरही पाठदुखी कायम राहणे, हात-पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा चालताना अडचणी निर्माण होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

News Title: Heavy School Bags Harm Spine

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now