शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

On: July 17, 2026 6:35 PM
PM Kisan Yojana
---Advertisement---

PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने (PM Kisan Yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 20 जून रोजी 23 वा हप्ता जमा झाल्यानंतर आता 24 व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 दरम्यान पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

24 व्या हप्त्याबाबत काय अपडेट? :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 20 जून रोजी पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन वर्ग केला होता. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा केली जाते. 23 वा हप्ता मिळाल्यानंतर आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 वा हप्ता ऑक्टोबर 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. काही अंदाजानुसार 20 ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचू शकते, तर काही दाव्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत माहितीकडेच लक्ष ठेवावे.

PM Kisan Yojana | लाभासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा :

पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. या डिजिटल व्यवस्थेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र फार्मर आयडी दिला जातो. भविष्यात विविध कृषी योजना, पीक विमा तसेच शासकीय अनुदानाचा लाभ थेट मिळावा यासाठी ही नोंदणी महत्त्वाची आहे. याशिवाय ई-केवायसी पूर्ण करणेही अनिवार्य असून, त्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांकाशी आधार लिंक, जमिनीचा 7/12 उतारा, 8-अ आणि बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

ई-केवायसी, आधार लिंकिंग, जमिनीची पडताळणी किंवा कागदपत्रांमधील नावातील त्रुटी वेळेत दुरुस्त न केल्यास पुढील हप्ता अडकू शकतो. ज्यांना मागील हप्ता मिळालेला नसेल त्यांनी http://pmkisan.gov.in वर जाऊन दुरुस्त करावे.

News Title: PM Kisan Yojana Next Installment Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now