काळजी घ्या! पुढचे 5 दिवस सूर्य आग ओकणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

On: April 8, 2025 8:00 AM
Heatwave Alert 11 Districts on High Risk
---Advertisement---

Heatwave Alert |  सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा उच्चांकी गाठत असून, हवामान विभागाने विविध स्तरांचे अलर्ट जारी केले आहेत. राजस्थानपासून दिल्लीपर्यंत आणि महाराष्ट्रातही उन्हाळ्याचा तीव्र प्रकोप जाणवू लागला आहे. (Heatwave Alert )

गेल्या 24 तासांमध्ये देशात तापमान झपाट्याने वाढले असून पश्चिम राजस्थान, कच्छ आणि सौराष्ट्र भागात उष्णतेची लाट तीव्र स्वरूप धारण करत आहे. बाडमेर (Rajasthan) आणि कांडला (Saurashtra) येथे कमाल तापमान 45.6 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) या भागांमध्ये ‘रेड अलर्ट’ घोषित केला असून नागरिकांनी उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, असा इशारा दिला आहे.

उष्णतेची लाट कायम राहणार

राजस्थान, गुजरात, विदर्भ, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या भागांमध्ये येत्या काही दिवसांत ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 7 एप्रिलपासून सुरू झालेली ही लाट 10 एप्रिलपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत तापमान 44 अंश सेल्सियसपेक्षा अधिक राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 8 व 9 एप्रिलसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि 10 एप्रिलसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात उष्णतेसोबत गारपीटही 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अकोला आणि विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली भागात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यावर उष्णतेसोबत गारपीटही धडक देणार आहे. (Heatwave Alert )

दुसरीकडे, दक्षिण भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मात्र पावसाचे वातावरण तयार झाले आहे. केरळ, तमिळनाडू, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आसाममधील काही भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर दिसून आला असून झारखंड, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आलेला आहे.

Title : Heatwave Alert 11 Districts on High Risk

 

Join WhatsApp Group

Join Now